शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

शासकीय गोदामाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:17 IST

अन्नधान्याची नासाडी होऊ नये, ते एका ठिकाणी साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना करून राज्यभरात सरकारी गोदामे बांधण्यात आली.

वैभव गायकर पनवेल : अन्नधान्याची नासाडी होऊ नये, ते एका ठिकाणी साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना करून राज्यभरात सरकारी गोदामे बांधण्यात आली. पनवेलमध्ये अशा प्रकारची चार गोदामे असून, त्यातील मोडकळीस आलेली तीन गोदामे जमीनदोस्त करून नव्याने सुमारे ३००० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधण्याकरिता निविदा काढण्यात आली असून त्यास २०१५ मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत गोदामाच्या बांधकामाला सुरु वातही झाली. मात्र दोन वर्षांपासून काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर वापरण्यात येणाºया गोदामासाठी सरकारच्या तिजोरीवर भुर्दंड पडत आहे.पनवेल तालुक्यात एकूण १९५ रास्त भाव धान्य दुकानदार आहेत. सर्वांना याच शासकीय गोदामातून धान्य पुरवठा केला जात होता. मात्र पनवेलमधील मार्केट यार्ड परिसरात असलेली गोदामे जीर्ण झाली होती. पावसाळ्यात त्यात पाणी शिरत असल्याने याच जागेवर नव्याने गोदाम बांधण्याला मंजुरी दिली. त्याअंतर्गत या तीन गोदामे जमीनदोस्त करून सुमारे १५५०.६४ चौरस मीटरचे नवे गोदाम बांधण्याची तरतूद केली. त्याची क्षमता ३००० मेट्रिक एवढी आहे. याकरिता सार्वजनिक बांधकाम खात्याने १ कोटी ९४ लाख १८ हजारांची अंतिम निविदा काढली असून काम हर्षद नंदकुमार गंदे या कन्स्ट्रक्शन कंपनीला सुमारे १ कोटी ६३ लाख १३ हजारांमध्ये मंजूर करण्यात आले. मात्र अतिशय धीम्या गतीने सुरू असलेल्या या कामामुळे तात्पुरत्या स्वरूपात साठवल्या जाणाºया गोदामासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सरकारला सोसावा लागत आहे.सध्याच्या घडीला कळंबोली येथील सीसीआय गोदामात पुरवठा विभागाच्या वतीने धान्य साठवले जाते. गोदामाचे महिन्याचे भाडे सुमारे २ लाख ३६ हजार ९८७ रु पये एवढे आहे. विशेष म्हणजे १ नोव्हेंबर २०१४ पासून पुरवठा विभागाने हे गोदाम भाडेतत्त्वावर घेतले असून त्याकरिता लाखो रु पये दरमहा मोजावे लागत आहेत. एकीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत सुरू असलेल्या नवीन गोदामाचे अद्याप खांब देखील उभे राहिले नाही. त्यामुळे हे काम पूर्णत्वाला जाणार तरी कधी, हा प्रश्न उपस्थित होत आहे. हे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पुरवठा विभागाला भाड्याचे गोदाम वापरावे लागणार आहे. अद्याप ३२ महिने गोदामाचे भाडे सरकारला द्यावेच लागणार आहे. ३२ महिन्यांच्या भाडेतत्त्वाच्या रकमेचा हिशोब केल्यास ही रक्कम सुमारे ७५ लाखांच्या वर जात असल्याने वर्षभरात हा आकडा कोट्यवधींच्या घरात पोहोचेल. मात्र जोपर्यंत नवीन गोदामाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत सरकारला लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.कळंबोली येथे असलेले गोदाम रास्त भाव धान्य दुकानदारांच्या दृष्टीने सोयीस्कर नसल्याने या दुकानदारांनाही फटका बसतो आहे. जितके पैसे आतापर्यंत भाडेतत्त्वासाठी खर्च करण्यात आले आहे, त्या रकमेत सर्व गोदामांची दुरुस्ती झाली असती, असे दुकानदारांचे म्हणणे आहे.सरकारने मंजूर केलेले काम पैसे अदा करूनही धीम्या गतीने होत आहे. पनवेलमधील सरकारी गोदाम वगळता आणखी तीन गोदामे तालुक्यात आहेत. पळस्पे, तळोजा आणि नेरे विभागात ही गोदामे आहेत. मात्र दुरवस्थेमुळे ती बंद आहेत. या गोदामांची दुरु स्ती केल्यास ती वापरता येतील, परिणामी सरकारचा भाडेतत्त्वापोटी होणारा खर्च वाचेल. मात्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे गोदामे धूळ खात आहेत.