शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर पहिले तीन दिवस सरकारने उपचार करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 05:58 IST

त्यामुळे मैत्रिणीने आपल्या मित्राला गाडी हळू चालविण्याचा सल्ला द्यावा.

विजय मांडे ।कर्जत : वाहने चालविताना ती वेगाने चालवू नयेत. मात्र, मुलींना इम्प्रेस करण्यासाठी कॉलेज तरुण वेगाने बाईक चालवितात आणि अपघात होतात. कॉलेज तरुणांना मैत्रीण आणि बाईक अधिक प्रिय असते, त्यामुळे मैत्रिणीने आपल्या मित्राला गाडी हळू चालविण्याचा सल्ला द्यावा. अपघात घडल्यानंतर जखमीवर पहिले तीन दिवस सरकारने उपचार करावेत. काही राज्यात ती पद्धत सुरू आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आरोग्य योजना जाहीर केली होती. मात्र, आजपर्यंत ही योजना कागदावरच असून सरकारने तो खर्च उचलावा, त्यासाठी सरकारला ५० पैशांच्या पोस्ट पाकिटावर लिहून मुख्यमंत्री तसेच उद्धव ठाकरे यांना जाब विचारला पाहिजे, असे परखड प्रतिपादन रस्ते वाहतूक या विषयातील तज्ज्ञ विनय मोरे यांनी केले.कर्जत येथील श्री समर्थ मोटार ट्रेनिंग स्कूल आणि विभागीय वाहतूक नियंत्रक पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण ज्ञानपीठ फार्मसी महाविद्यालयात रस्ते वाहतूक याबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे आठवे शिबिर आयोजित करण्यात आले असून, या वेळी फार्मसी विभागातील १५० विद्यार्थी यांनी रस्ते वाहतूक आणि सुरक्षितता या विषयावर आयोजित शिबिरात सहभाग घेतला. त्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय परिवहन अधिकारी नीलेश घोटे, रस्ते वाहतूक अभ्यासक विनय मोरे, प्रसिद्ध जादुगार सतीश देशमुख, कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य विजय मांडे, सतीश पिंपरे, फार्मसी विभागाचे प्राचार्य काळे, श्री समर्थ मोटार ट्रेनिंग स्कूलचे अभिजित मराठे, नीलेश मराठे आदी प्रमुख उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांना जादुगार सतीश देशमुख यांनी काही जादूचे खेळ दाखवून वाहतुकीचे नियम यांची माहिती दिली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने राज्यात वाहतूक नियम सांगण्यासाठी महाविद्यालय येथे जाऊन मार्गदर्शन करणारे आणि वाहतूक नियम बनविण्यास भाग पाडणारे अभ्यासक विनय मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी बोलताना मोरे यांनी प्रामुख्याने विद्यार्थ्यांशी संबंधित वाहतूक नियम याबाबत मार्गदर्शन केले. त्यात वाहतूक नियम बनविण्यासाठी आम्ही शासनाला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सूचना करीत आहोत. या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील तशा सूचना केल्यास त्यांचा आदर केला जाईल, असे मोरे यांनी स्पष्ट केले.विद्यार्थ्यांना सल्ला देताना त्यांनी धूम स्टाइलने गाडी चालविणे सोडून दिल्यास अपघात कमी होतील, असे सूचित करताना मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी धूम स्टाइलने गाडी चालवत असाल, तर त्या मैत्रिणीने आपल्या मित्राचे पाय तुटलेले पाहायचे आहे काय? असा सवाल उपस्थित केला. या वेळी त्यांनी शासनाच्या, ‘हात दाखवा गाडी थांबवा’ या संकल्पनेवर नाराजी व्यक्त केली. एसटी, खासगी बस, रिक्षा, प्रवासी वाहन यांनी आपण कुठे थांबणार आहोत, याची माहिती पाठीमागील बाजूस लावावी, अशी मागणी केली.

टॅग्स :Accidentअपघात