शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

'जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा सरकारचा घाट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 01:37 IST

सुनिल तटकरे यांचा आरोप; पाणी देण्याला विरोध

अलिबाग : भिरा भिवपूरी येथील जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा आरोप रायगडचे नवनिर्वाचित खासदार सुनिल तटकरे यांनी केला. रायगडच्या जनतेच्या हक्काचे पाणी अन्यत्र कोठेही वळवून दिले जाणार नाही. त्याला कडाडून विरोध केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेमध्ये बैठक बोलावली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सह्याद्रीच्या कुशीतून कोकणात मोठ्या प्रमाणात पाणी येते. पश्चिमेकडे येणारे पाणी पूर्वकडे वळवण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. वशिष्ठ, कुंडलीका, अंबा नदीचे पाणी अन्यत्र वळवण्यात येणार आहे. परंतू कोकणातील वाढत्या नागरिकरणासाठी, दुबार शेतीसाठी, उद्योगासाठी लागणारे पाणी हे मिळालेच पाहीजे. ते कोठेही जाऊ दिले जाणार नाही.भिरा भिवपूरी येथील जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. तो हाणून पाडला जाईल. कारण भिरा, कोयना जलविद्युत प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी रायगडतील अंबा, कुंडलीका, वशिष्ठ नदीमध्ये जाते. त्याचा वापर जिल्ह्यात पिण्यासाठी शेतीसाठी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी होतो. तसेच येथे उत्पादीत होणारी स्वस्त विज मुंबईकरांना दिली जाते. त्यामुळे हे प्रकल्प बंद करण्याला कडाडून विरोध केला जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.रायगड जिल्हा परिषदेमध्ये तटकरे यांनी विविध विकास कामांच्या अनुशंगाने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सर्वप्रथम त्यांनी बएसएनएल सेवेचा जिल्ह्यात उडालेल्या बोजवाºयावर लक्ष केंद्रीत करत अधिकाºयांची कान उघाडणी केली. बीएसएनएलची बहुतांश कार्यालयेही भाड्याच्या जागेत आहेत. त्यांचे भाडे थकल्याने त्यांना टाळे लागल्याने काम होत नाहीत. तसेच काही कार्यालयांचे विजेचे बिल थकल्यानेही ब्रॉडबॅण्ड सेवा कोलमडून पडली आहे. यावर उपाय म्हणून त्यांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांसाठी दुरसंचार मंत्र्याची भेट घेणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट करुन महावितरणे बीएसएनएलची विज सेवा खंडी करुन नये असे निर्देश दिले.लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर तटकरे यांनी विविध खात्यांच्या अधिकाºयांच्या बैठका घेतल्या. त्यामध्ये अलिबाग-विरार एक्सप्रेस कॉरीडॉर, मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, रेवस-रेड्डी या राष्ट्रीय महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.भिरा, कोयना जलविद्युत प्रकल्पातून बाहेर पडणारे पाणी रायगडमधील अंबा, कुंडलिका, वशिष्ठ नदीमध्ये जाते. त्याचा वापर जिल्ह्यात पिण्यासाठी शेतीसाठी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी होतो.येथे उत्पादीत होणारी स्वस्त विज मुंबईकरांना दिली जाते. त्यामुळे हे प्रकल्प बंद करण्याला कडाडून विरोध केला जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे