शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
3
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
4
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
5
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
6
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
7
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
8
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
9
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
10
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
11
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
12
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
13
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
14
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
15
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
16
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
17
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
18
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
19
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
20
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये ‘शासन-प्रशासन आपल्या दारी’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:25 IST

महापालिकेचा नवा उपक्रम : आयुक्तांनी साधला नागरिकांशी संवाद; घनकचरा व्यवस्थापनाविषयी चर्चा

पनवेल : ‘शासन-प्रशासन आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार पनवेल महापालिका आयुक्त देशमुख यांनी खारघर शहरातील विविध सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांशी रविवारी संवाद साधला. स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन पालिकेच्या मार्फत राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती या वेळी देण्यात आली. तसेच घनकचरा व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.पालिकेच्या स्थापनेला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. गणेश देशमुख यांनी सात महिन्यांपूर्वी पनवेलचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. सुरु वातीच्या काळात आचारसंहिता, त्यानंतर प्रशासनाची घडी बसविण्यातच त्यांचा कालावधी गेला. त्यामुळे आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्णय आयुक्त देशमुख यांनी घेतला आहे. त्याअनुषंगाने ‘आयुक्त आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत थेट नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. रविवारी या उपक्रमाअंतर्गत खारघरवासीयांशी संवाद साधण्यात आला. खारघरमधील हाईड पार्क, थारवानी हेरिटेज व केसर हार्मनी या सोसायट्यांच्या पदाधिकाºयांशी संवाद साधला. महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेली झीरो गार्बेज मोहीम, घनकचरा व्यवस्थापन तसेच सध्याच्या घडीला सुरू असलेल्या प्रकल्पाची माहिती या वेळी देण्यात आली. या वेळी रहिवाशांनी काही सूचना केल्या. नागरिकांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन कार्यवाही गेली जाईल, अशी ग्वाही आयुक्त देशमुख यांनी या वेळी दिली.प्रभाग समिती सभापती अभिमन्यू पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती लीना गरड, नगरसेवक नीलेश बाविस्कर, हरेश केणी, अजीज पटेल, गुरु नाथ गायकर, नगरसेविका नेत्रा किरण पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील तसेच प्रभाग अधिकारी भगवान पाटील, स्वच्छता निरीक्षक दौलत शिंदे, शैलेश गायकवाड आदी उपस्थित होते. पालिका क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन करणाºया ७४ वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी या वेळी दिली. यामुळे पालिका क्षेत्रात कोणत्या ठिकाणी किती कचरा संकलित केला जाणार आहे याची परिपूर्ण माहिती प्राप्त होणार आहे. सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने नागरिकांनीदेखील या बैठकीला हजेरी लावली होती. पालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने मंजूर झालेले प्रकल्प, नैसर्गिक स्रोत याचा पुरेपूर वापर करून शहरातील पाण्याचे नियोजन केले जाणार आहे. तसेच तीन वर्षांच्या काळात शहरातील पाणीपुरवठ्याच्या योजना अमलात येणार असल्याचेही आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले.पालिकेमार्फत राबविण्यात येणाºया योजना, प्रकल्प आदीची माहिती या बैठकीत नागरिकांना देण्यात आली. प्रशासन व नागरिक संवाद हाच या उपक्रमाचा उद्देश आहे. नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे या बैठकीत सहभाग घेतला. भविष्यात पालिका क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधून विविध प्रश्न मार्गी लावले जातील.- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेलआयुक्त स्वत: आमच्या सोसायटीत आले. त्यांनी आमच्याशी संवाद साधला. आमच्या सूचना ऐकून घेतल्या, तसेच पालिकेच्या मार्फत राबविण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. आयुक्तांनी घेतलेला पुढाकार खरोखरच स्तुत्य उपक्र म आहे.- मंगेश रानवडे, पदाधिकारी,हाईड पार्क सोसायटी, खारघर

टॅग्स :panvelपनवेलMuncipal Corporationनगर पालिका