शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

#GoodBye2017: धिंगाणा घालणा-यांवर राहणार ड्रोनची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 2:41 AM

अलिबाग : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स लॉजिंग, कॉटेजेस हाउसफुल्ल झाली आहेत.

अलिबाग : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स लॉजिंग, कॉटेजेस हाउसफुल्ल झाली आहेत. जिल्ह्यात विशेषत: अलिबागमध्ये येणाºया पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अलिबाग समुद्रकिनारी तसेच शहर परिसरामध्ये ड्रोन कॅमेºयाची नजर राहणार आहे.३१ डिसेंबर रोजी रायगड जिल्ह्यात येणाºया पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलीस दलातर्फे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडील कर्मचाºयांशिवाय सुमारे ३०० पोलीस कर्मचारी अतिरिक्त नेमण्यात आले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग, अलिबाग मार्गावर वाहतुकीसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी चेकपोस्टवर बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वेळोवेळी वाहनांची तपासणी, नाकाबंदी करण्यात येणार आहे. पर्यटक मोठ्या संख्येने ज्या ठिकाणी जातात. त्यातील अलिबाग, नागाव, मुरु ड, दिघी समुद्रकिनाºयासह बीचवर बिट मार्शल आणि दामिनी पथकाची विशेष पेट्रोलिंग टिम नेमण्यात आली आहे. याशिवाय विविध संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट, तसेच नियंत्रण कक्ष पी.सी.आर. मोबाइलही सज्ज ठेवण्यात आले आहेत.सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन बोटी समुद्रामध्ये पेट्रोलिंगसाठी ठेवण्यात आल्या आहेत. सागरी गस्तीबाबतही संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबर रोजी दारू पिऊन वाहन चालवणाºया तळीरामांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. ठिकठिकाणी ब्रेथ अ‍ॅनालायझर मशिनचा वापर करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाºयांवर कायद्याचा बडगा उगारण्यात येणार आहे. पर्यटकांनी ३१ डिसेंबर रोजी आपल्यामुळे दुसºयाला त्रास होणार नाही, याची खबरदारी घेऊन सुरक्षितपणे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करावे, असे आवाहन रायगड पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील विविध हॉटेल्सही सज्ज झाली आहेत. काही ठिकाणी डीजे नाइट पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. रेस्टॉरंट बारमालकांना त्यांची नेहमीची जागा कमी पडणार असल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून तात्पुरते परवाने काढले आहेत.>महाविद्यालयीन विद्यार्थीकरणार पोलिसांना मदतअलिबाग, वरसोली, नागाव, किहीम बीचवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे अशा गर्दीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी साध्या वेशामध्ये धिंगाणा घालणाºयांवर नजर ठेवणार आहेत. अनुचित प्रकार घडताना आढळल्यास ते तातडीने पोलिसांना कळवणार आहेत.

टॅग्स :RaigadरायगडBest of 2017बेस्ट ऑफ 2017