शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोगावलेंचे प्रतिज्ञापत्र गुन्हेगारीने भरलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:03 IST

सुनील तटकरे यांची टीका : बिरवाडी येथे प्रचारसभा

बिरवाडी : महाडचे आमदार भरत गोगावले यांचे प्रतिज्ञापत्र गुन्हेगारीने भरलेले असल्याची टीका आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी महाड तालुक्यातील बिरवाडी येथील श्लोक क्र ीडा नगरी येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत केली आहे.

सुनील तटकरेंविरु द्ध एक साधी एनसीदेखील दाखल नाही. सिंचन घोटाळ्याबाबत गेली पाच वर्षे आपली चौकशी सुरू आहे, याबाबतची माहिती आपण निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिली आहे. मात्र, त्याबाबत गेल्या पाच वर्षांत कोणती कारवाई झालेली नाही असे तटकरे यांनी सांगितले. आमदार गोगावले यांनी माझ्यावर टीका करण्यापूर्वी आपले गुन्हेगारीने भरलेले प्रतिज्ञापत्र तपासून पाहावे. बिरवाडी गावामध्ये कोट्यवधी रु पयांची विकासकामे सुनील तटकरे यांच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत, ही वस्तुस्थिती आमदार भरत गोगावले आणि खा. अनंत गीते नाकारू शकत नाहीत. खा. अनंत गीते यांनी आपल्या पाच वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळांमध्ये मतदारसंघातील गावांमध्ये शौचालय उभारणे, याव्यतिरिक्त कोणतेही काम केलेले नाही. विकास गोगावले हे सर्वांची कुंडली आपल्याकडे असल्याची भाषा करतात, यावर भाष्य करताना सुनील तटकरे यांनी आपले वय काय? आपण बोलतो काय? असे सांगून आपल्याबाबतची माहितीदेखील आमच्याकडे उपलब्ध आहे. मात्र, पोरकट मुलांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही, असे सांगितले.माजी आमदार माणिकराव जगताप यांनी आपल्या भाषणात महाड एमआयडीसीमधील दहशत संपवून टाकू, असा इशारा देत शिवसेनेकडे केंद्रात आणि राज्यात उद्योग मंत्रिपद असतानादेखील कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत, अशी टीका केली. बंद पडलेल्या कारखान्यांमधून केवळ भंगार गोळा करण्याचे काम हे शिवसेनेच्या नेत्यांकडून सुरू आहे.

बिरवाडी परिसरातील विकासकामे ही आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाली. मात्र, बिरवाडी पाणी योजनेमध्येही संबंधित ठेकेदारांनी भ्रष्टाचार केला आहे. अनंत गीते यांनी गेली ३० वर्षे या परिसरातील विकासकामे के ली नाहीत, अशी टीका के ली.शिवसेनेचे दिवंगत नेते सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून, या प्रकरणीदेखील लक्ष घालणार असल्याचा पुनरुच्चार माजी आमदार माणिकराव जगताप यांनी केला. या वेळी राष्ट्रवादीचे सुभाष निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :raigad-pcरायगड