शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या मुलाला जीवनदान; पालिकेच्या विद्युत विभागाची तत्परता 

By वैभव गायकर | Updated: July 21, 2023 18:20 IST

एकीकडे मुसळधार पाऊस आणि पावसाच्या पाण्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पंधरा वर्षाच्या मुलाला पनवेल महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले आहे.

पनवेल : एकीकडे मुसळधार पाऊस आणि पावसाच्या पाण्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पंधरा वर्षाच्या मुलाला पनवेल महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले आहे. दि.19 रोजी रात्री दहाच्या सुमारास दिबा पाटील नगर परिसरातील ही घटना आहे.

मंथन तारे (15) असे या मुलाचे नाव असुन मंथन ची प्रकृती उत्तम आहे.महावितरणची ओव्हरहेड वायर रस्त्यावर पडून तिचा  विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने याठिकाणाहून जाणारा मंथनला या विजेचा जोरदार झटका बसल्याने तो बेशुद्ध पडला. महावितरण कडून प्रतिसाद मिळत नसल्याने या ठिकाणच्या काही नागरिकांनी पालिकेच्या विद्युत विभागाला ही बाब सांगितली. यावेळी तत्काळ अग्निशमनचे कर्मचारी, विद्युत विभागाचे अधिकारी प्रीतम पाटील, इलेक्ट्रीशन नितीन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड यांनी ओव्हरहेड बाहेर बाजूला केली.

त्यानंतर प्रीतम पाटील यांनी पालिकेच्या एम्बुलन्स मधून उपजिल्हा रुग्णालय गाठत मंथन ला रुग्णालयात दाखल केले.घटनेची माहिती मिळताच उपायुक्त सचिन पवार हे देखील उपजिल्हा रुग्णालयात पोहचले.प्राथमिक उपचार केल्यानंतर मंथनला उपजिल्हा रुग्णालयातून हालवून एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.तत्काळ मदत मिळाल्याने मंथनचे प्राण वाचले. दरम्यान पालिकेचे विद्युत विभाग अथवा अग्निशमन दलाने तत्परता दाखवत घटनास्थळी पोहचून लागलीच मंथनला रुग्णालयात दाखल करून त्याचे प्राण वाचविल्याने आयुक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

विद्युत  विभाग तसेच अग्निशमन दलाने  तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली.महावितरणची ओव्हर हेड वायर बाजूला सारून तत्काळ या जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.यामुळे त्याचे प्राण वाचले.त्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केलेच पाहिजे. - गणेश देशमुख (आयुक्त,पनवेल महानगरपालिका)

टॅग्स :panvelपनवेलelectricityवीज