शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

गीते-तटकरे यांच्यात रायगडमध्ये थेट लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:53 IST

रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे व युतीचे अनंत गीते यांच्यातच सरळ लढत होणार आहे.

आगरदांडा : रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे व युतीचे अनंत गीते यांच्यातच सरळ लढत होणार आहे. आचारसंहितेपूर्वीच या दोन्ही उमेदवारांनी थेट जनसंपर्कावर भर दिला आहे. या मतदारसंघातून सातत्याने यशाच्या पुनरावृत्तीचे आव्हान अनंत गीते यांच्यासमोर असून रायगड यंदा काबीज करायचा या इराद्याने सुनील तटकरे यांनी रणनीती आखली आहे.तब्बल सहा वेळा अनंत गीते शिवसेनेकडून निवडून जात आहेत. पूर्वीच्या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातही शिवसेनेने दबदबा कायम ठेवला होता. या दबदब्याला २००९ च्या निवडणुकीत प्रथमच सुरुंग लावण्याचा तटकरेंचा प्रयत्न असफल झाला. २००९ च्या निवडणुकीत गुहागरपासून अलिबागपर्यंत पसरलेल्या या विस्तीर्ण मतदारसंघात अनंत गीते यांना ३ लाख ९६ हजार १७८ मते मिळाली तर सुनील तटकरे यांना ३लाख ९४ हजार ६८ मते मिळाली.२०१९च्या निवडणुकीची रणनीती तटकरे यांनी पाच वर्षांपासूनच आखण्यास सुरु वात केली होती. त्याचा लाभ त्यांना मिळू शकतो. तटकरे यांची जमेची बाजू म्हणजे, या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक तीन आमदार भास्कर जाधव, संजय कदम व अवधूत तटकरे यांच्या रूपाने त्यांच्याकडे आहेत. अलिबाग व पेण येथे शेकाप पक्षाचे पंडित पाटील व धैर्यशील पाटील या दोन आमदारांची रसद त्यांना मिळू शकते. याउलट गीते यांच्याकडे केवळ महाड-पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांचीच साथ असणार आहे. मात्र, असे असले तरी शिवसेनेचे मजबूत संघटन व भाजपाची साथ गीते यांची जमेची बाजू आहे. गुहागरपासून अलिबागपर्यंत शिवसेनेचे खोलवर असलेले जाळे शिवाय मागील निवडणुकीत गीते यांना अंतर्गत बेबनावाचा फटका बसला होता. यावेळी मात्र अंतर्गत बंडाळीचे आव्हान गीते यांच्यासमोर नसणार आहे. शिवाय दापोली, खेड, मंडणगडमधून गीते यांना मोठे मताधिक्य देण्याची सिद्धता रामदास कदम यांनी केली आहे.दोन्ही नेते सज्जगीते व तटकरे ही लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. गीते यांचा कुणबी फॅक्टर मजबूत राहिलेला नाही.युती असताना व मोदी यांची लाट असतानाही २०१४ मध्ये तटकरे यांनी गीते यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी रायगड काबीज करण्यासाठी दोन्हीही नेते सज्ज झाले आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAnant Geeteअनंत गीतेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस