शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घारापुरी :  समुद्राखालील चौथ्या केबलची दुरुस्त करण्यात महावितरणला यश   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 20:33 IST

चार केबल्स पैकी दोन केबल्स न्हावाखाडी ते मोराबंदर दरम्यान समुद्रामध्ये नादुरुस्त झाल्यामुळे घारापुरी बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

उरण : समुद्राच्या तळाखालून  ७ कि. मी. केबल टाकून विद्युतीकरण करण्यात आलेल्या चौथ्या केबलची दुरुस्ती करण्यातही महावितरणला यश    आले आहे.

 या चार केबल्स पैकी दोन केबल्स न्हावाखाडी ते मोराबंदर दरम्यान समुद्रामध्ये नादुरुस्त झाल्यामुळे घारापुरी बेटावरील राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सदर वीजपुरवठा याआधीच २ फेज द्वारे चालू करण्यात आला होता. परंतु  थ्री फेज वीजपुरवठा नसल्यामुळे पाणीपुरवठा करणारा विद्युत पंप बंद पडल्याने तीनही गावातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.त्यातच एकाच रंगाच्या केबल्स असल्याने दोष शोधून काढण्यात आणि सबमरीन जॉईंट मारण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.त्यातच पावसाळी, वादळी वातावरण, खवळलेला समुद्र, समुद्राचा तळामध्ये असलेला पाण्याचा दाब व पाण्याखाली वाहणारे प्रवाह यामुळे आव्हान अधिकच कठीण झाले होते. मात्र महावितरणने हे आव्हान स्वीकारले आणि  ३७ दिवसांचा अथक प्रयत्नांमुळे नादुरुस्त केबल्सचा दोष काढून केबल चालू करून घारापुरी बेटावरील वीजपुरवठा तीन केबल्सवर सुरू करण्यात आला होता.

मात्र चौथ्या केबल्सची दुरुस्ती झाली नसल्याने बेटावरील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र यांनी घारापुरीचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. या कामाबाबत संचालक (संचलन)  संजय ताकसांडे,सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे व  भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी जातीने लक्ष देऊन कामाला गती देण्यासाठी वाशी विभागाचे अधीक्षक अभियंता (प्रभारी), श्री.सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर विभागाअंतर्गत असलेल्या भिंगारी उपविभागातील अति. कार्यकारी अभियंता देविदास बैकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी समुद्राखालील चौथ्या केबलची दुरुस्त करण्यात महावितरणला यश आले आहे . यामुळे बेटावरील  वीजपुरवठा सुरळीत सुरू होणार असल्याचा दावा महावितरणने सोमवारी (१८) उशिरा दिलेल्या प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातुन केला आहे.