शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आकले ग्रामपंचायतीमधील बोअरवेल पाण्यामधून जंतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 06:28 IST

महाड तालुक्यातील आकले ग्रामपंचायतीमध्ये बोअरवेलच्या पाण्यामधून जंतू आढळल्याची घटना घडली आहे. आकले ग्रामपंचायतीमधील मराठी आळी येथील बोअरवेलच्या पाण्यामधून जंतू बाहेर येत असल्याची घटना गेल्या चार दिवसांपासून घडत असल्याने, ग्रामस्थांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी बिरवाडी प्राथमिक आरोग्यकेंद्र यांना लेखी निवेदन...

लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड तालुक्यातील आकले ग्रामपंचायतीमध्ये बोअरवेलच्या पाण्यामधून जंतू आढळल्याची घटना घडली आहे. आकले ग्रामपंचायतीमधील मराठी आळी येथील बोअरवेलच्या पाण्यामधून जंतू बाहेर येत असल्याची घटना गेल्या चार दिवसांपासून घडत असल्याने, ग्रामस्थांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी बिरवाडी प्राथमिक आरोग्यकेंद्र यांना लेखी निवेदन आणि सदर बोअरवेलच्या पाण्याचे नमुने तपासणीकरिता देऊन अहवाल मागितला. या बोअरवेलचे पाणी गावातील ग्रामस्थ पिण्याकरिता वापरत असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत माहितीसाठी उपसरपंच, पाणी कमिटीचे सचिव प्रशांत खोपकर यांच्याशी संपर्क साधला असता, बोअरवेलच्या पाण्यामध्ये टीसीएल पावडर टाकण्यात आली आहे. मात्र, पाण्यामध्ये जंतू कोठून आले याचा शोध घ्यावा लागेल, असे सांगितले. आकले ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्यकेंद्राला दिलेल्या निवेदनाची प्रतमाहितीवर योग्य कारवाईकरिता गटविकास अधिकारी महाड तालुका आरोग्याधिकारी ग्रामपंचायत आकले यांना दिली आहे. या गावांमध्ये नळाला पाणी येत नसल्याने बोअरवेलवरील पाणी पिण्याकरिता वापरले जात असल्याची माहिती येथील महिलांनी दिली. अशा परिस्थितीत बोअरवेलच्या पाण्यामध्ये जंतू आढळल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.

टॅग्स :Waterपाणी