शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

गोरेगावचा महावितरण अधिकारी लाच घेताना अटक

By राजेश भोस्तेकर | Updated: July 19, 2023 20:51 IST

तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी रायगड लाचलुचपत विभाग अलिबाग येथे येऊन तक्रार दाखल केली. 

अलिबाग : राहते घराचे जवळ असलेला इलेक्ट्रिक पोल बदली करण्याकरिता व नवीन इलेक्ट्रिक पोल बसविण्यासाठी मागितलेल्या ७ हजार लाचे प्रकरणी गोरेगाव विभागातील महावितरणचे कार्यकारी अभियंता लाच लुचपत पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत. गणेश तुकाराम पाचपोहे, वय 55 वर्षे असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. रायगड लाच लुचपत पथकाने ही कारवाई केली आहे. 

तक्रारदार यांचे गोरेगाव येथे घर आहे. घराच्या जवळ महावितरण विभागाचा इलेक्ट्रिक पोल आहे. हा पोल हलवून त्याठिकाणी नवीन पोल बसविण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. याबाबत आरोपी गणेश पाचपोहे यांना मंगळवारी १८ जुलै रोजी भेटून माहिती दिली. आरोपी पाचपोहे यांनी तक्रारदार यांच्याकडे या कामासाठी सात हजाराची मागणी केली. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी रायगड लाचलुचपत विभाग अलिबाग येथे येऊन तक्रार दाखल केली. 

तक्रारदार यांच्या तक्रारी नुसार लाच लुचपत पथकाने पडताळणी करून सापळा रचला. बुधवारी आरोपी गणेश पाचापोहे यांनी तक्रारदार यांच्याकडून सात हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे, पोलीस निरिक्षक  रणजीत गलांडे, स.फौ. अरुण करकरे, स.फौ. विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार कौस्तुभ मगर, पोलीस हवालदार विवेक खंडागळे, पोलीस नाईक सचिन आटपाडकर या पथकाने यशस्वी कारवाई केली.

टॅग्स :alibaugअलिबागBribe Caseलाच प्रकरण