शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Ganeshotsav 2022 : 22 गावांमध्ये 'एक गाव एक गणपती'; धूमधडाक्यात साजरा होतो गणेशोत्सव

By निखिल म्हात्रे | Updated: September 6, 2022 15:08 IST

Ganeshotsav 2022 : समाजामध्ये एकोपा निर्माण करणारी आणि आर्थिक उधळपट्टीला चाप लावणारी ‘एक गाव एक गणपती’ ही ग्रामीण भागातील प्रथा शहरवासीय कधी आत्मसात करणार हाही प्रश्नच आहे.

अलिबाग - समाजामध्ये एकोपा आणि सलोख्याचे संबंध वृद्धिंगत व्हावे, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आता जिल्ह्यामध्ये जोर धरताना दिसून येते. यावर्षी जिल्ह्यातील 22 गावांमध्ये, ‘एक गाव एक गणपती’ उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. एखादी नवीन स्टाईल अथवा नवा ट्रेंड हा शहराकडून ग्रामीण भागाकडे जातो. ग्रामीण भागातील नागरिक विशेष करून तरुणाई तो ट्रेंड तातडीने आत्मसात करतात परंतु अशा काही तुरळकच प्रथा, गोष्टी आहेत. 

ग्रामीण भागाकडून शहराकडे जातात. समाजामध्ये एकोपा निर्माण करणारी आणि आर्थिक उधळपट्टीला चाप लावणारी ‘एक गाव एक गणपती’ ही ग्रामीण भागातील प्रथा शहरवासीय कधी आत्मसात करणार हाही प्रश्नच आहे. शहरी आणि ग्रामीण विभागातील भक्तांना दहा दिवस निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जायचे. मात्र, बदलत्या काळात गणेशोत्सवाचा ‘इव्हेंट’ झाल्यापासून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण आले आहे. विविध मंडळे ही स्थानिक राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेली असल्याने त्यामध्ये भक्तीचे प्रमाण कमी झाल्याचे बोलले जाते.

गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलावर मोठा ताण असतो. त्यातच सार्वजनिक गणपतींची वाढती संख्या ही पोलिसांच्या कामात भर पाडणारीच आहे. काही मंडळे आपलाच गणपती कसा मोठा आहे? आमच्याच मंडळांची मिरवणूक किती मोठी आहे. हे दाखविण्यासाठी मंडळांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.

मुंबईसह पुण्यासारख्या शहरातच नव्हे, तर गावागावांतील गणेशोत्सव शांततेत पार पाडणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरू लागले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सार्वजनिक गणेशोत्सवात होणारी पैशांची उधळपट्टी थांबावी, गावातील वाद मिटावेत आणि लोक वर्गणीचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन मतीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘एक गाव एक गणपती’चा पुरस्कार करीत, हा उपक्र म गावागावांत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव’ अभियानात, ‘एक गाव एक गणपती’च्या उपक्रमाचा समावेश करून या चळवळीला राजकीय बळ देण्याचे काम केले.

भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष. या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. गणेशोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या एकजूटीतून जिल्ह्यातील 22 गावांत  एक गाव-एक गणपती हा उपक्रम साकारण्यात आला. गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलावर मोठा ताण असतो. त्यामुळे नागरीकांनी जबाबदारीने वागून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन यांनी केले आहे.

- अशोक दुधे, जिल्हा पोलीस अधिक्षक. 

टॅग्स :alibaugअलिबागGaneshotsavगणेशोत्सव