शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाला महागाईची झळ; मूर्तींच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:24 IST

दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा : मूर्तींना मागणी वाढली; मात्र सजावटीचे साहित्य खरेदी कमी

दिघी : श्रीवर्धन तालुक्यात सार्वजनिक गणेशमंडळांची मूर्ती आणण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे घरांमध्ये गणेशाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. यंदा गणेशमूर्तींच्या दरात वाढ झालेली असली तरी मागणीही वाढल्याने मूर्तिकार आनंदात आहेत. श्रीवर्धनमधील बाजारपेठेत लगबग सुरू झालेली पाहायला मिळते. मात्र, या वेळी महागाईमुळे गणेशोत्सवात खरेदीला ग्राहक कमी प्रमाणात असल्याचे येथील दुकानदार सांगतात. गणेशमूर्तींचे दर ४०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत.

गणेशाचे आगमन सहा दिवसांवर येऊन ठेपले असताना श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली-पंचतन परिसरात घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या मिळून अधिक मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती विराजमान होतात. दीड दिवसांच्या १२०० तर पाच दिवसांच्या २५०० गणेशमूर्ती आणि सार्वजनिक एक मूर्ती असून, अनंतचतुर्थीचे ८०० तर २१ दिवसांचे पाच अशी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना बोर्ली-पंचतन परिसरात होणार आहे. गणपतीच्या आगमनाची चाहूल लागल्यापासून बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी विविध प्रकारची कापडी मखरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्तींनी बाजारपेठ सुगंधित केली आहे. गौरी-गणपतीसाठी लागणारे हार लोकांचे लक्ष दुकानांकडे वेधून घेताना दिसत आहेत. लाडू, मोदक, साखरफुटाणे दुकानांवर दिसू लागले आहेत. गौरी-गणपतीची गाणी, फुगड्यांची गाणी, अभंग-भजन, मंत्र व आरत्यांच्या कॅसेट्स, सीडीज आल्या आहेत.च्वाद्यांच्या दुकानात ढोलकी कारागिरांकडे ढोलकी भरण्यासाठी गर्दी झाली आहे. त्यामुुळे बाजारपेठेत गणेशोत्सवाची चाहूल श्रावण महिन्यापासूनच जणू लागली आहे. आता चाकरमानी मंडळींनाही गावाकडचे वेध लागले आहेत. गावातील लोकही गणरायाचे आगमन होणार असल्याने घरादारांच्या साफसफाईमध्ये गुंतलेले दिसून येत आहेत. या सणानिमित्त चाकरमानी गावी येणार असल्याने गावातील मंडळींमध्येही उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे.

सजावटीच्या कामाला वेगच्एकीकडे कारखान्यांमध्ये गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरत असताना सार्वजनिक गणेशमंडळांचे मंडप आणि घरांमध्ये गणेशाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. देखावे आणि सजावटीच्या कामांनी वेग घेतला आहे.दुकाने सजली मात्र ग्राहकच नाहीतरेवदंडा : गौरी-गणपतीचा उत्सव आता पाच दिवसांवर येऊन ठेपला असून, गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठेत दुकाने सजली असून ग्राहकराजा मात्र भडकलेल्या महागाईने त्रस्त असल्याने अनेक दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागताना दिसत आहे.जीवनावश्यक वस्तू म्हटल्या की किराणा सामान आलेच, त्या दुकानात कडधान्ये, तेल, साखर आदी वस्तू भडकल्या असल्याने ग्राहकराजा अद्याप हव्या त्या प्रमाणात खरेदी करताना दिसत नाही. पूजेच्या साहित्याची दुकाने सजली असली तरी ग्राहकांची वर्दळ जाणवत नाही. सजावटीच्या साहित्याची दुकाने सजू लागली आहेत. विविध प्रकारची तोरणे, माळा, रंगीत बल्ब विक्रीला दिसत आहेत. प्रसादाचे साहित्य विक्रीला आलेले दिसत आहे.३दिल्लीतील ढोलकीवाले, गणपती उत्सवाच्या सजावटीतील पडदे फेरीवाले विक्रीला वाहनांतून घरोघरी येताना दिसत आहेत. या वर्षी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने श्रावणातील येणाºया स्थानिक भाज्या उपलब्ध होऊ न शकल्याने घाटमाथ्यावरील भाज्या कडाडलेल्या दिसत आहेत. फुलांची आवक तर पूर्णपणे घटल्याने ऐन गणपतीत फुले वधारलेली राहणार, असा फुलविक्रेत्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. 

महागाईमुळे देशभरातील आर्थिक मंदीचे सावट आता ग्रामीण भागातही दिसून येत आहे. दरवर्षीच्या तुलनेत या वेळी गणेशोत्सवातील खरेदीसाठी ग्राहकांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.- श्यामकांत भोकरे, दुकानदार , बोर्ली-पंचतन.