शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला

By admin | Updated: September 7, 2016 03:16 IST

तालुक्यात दीड दिवसाच्या ८१५ बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तगणांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’

रोहा : तालुक्यात दीड दिवसाच्या ८१५ बाप्पांचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तगणांनी ‘पुढच्या वर्षी लवकर या’, असे म्हणत बाप्पाला निरोप दिला. यावेळी शहरातील विसर्जन स्थळांवर गर्दी झाली होती. यासाठी येथे चोख पोलीस बंदोबस्त होता.रोहा नगर पालिकेचे नगराध्यक्ष समीर शेडगे व मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती विसर्जनासाठी नगरपालिकेतर्फे विसर्जन स्थळांवर योग्य ती व्यवस्था आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मुख्याधिकारी प्रकाश पाटील हे स्वत: विसर्जन स्थळांवरील सुविधांबाबत लक्ष ठेवून कर्मचाऱ्यांना सूचना देत होते. दुपारी ३ वाजल्यानंतर एकामागून एक घरगुती गणपती विसर्जनासाठी नदीकिनारी निघाले होते. तत्पूर्वी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने दुपारी शहरातील विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे राहावेत यासाठी प्रशासकीय वाहनांमधून सायरन देत पेट्रोलिंग करण्यात आले. यामध्ये महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.भक्तगणांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे गजर करीत आपल्या बाप्पांचे कुंडलिका नदीकिनारी भावपूर्ण वातावरणात विसर्जन केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये विसर्जन मार्गावर आणि नदीकिनारी चोख पोलीस बंदोबस्त होता. रोहा तालुक्यात दीड दिवसाच्या एकू ण८१५ बाप्पांचे विसर्जन करण्यात आले असल्याची माहिती रोहा पोलीस ठाण्याचे सुजय मगर यांनी दिली.जिल्ह्यात २४ हजार २६४ घरगुती गणपतींचे शांततेत विसर्जन1अलिबाग : सोमवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी आगमन झालेल्या आणि दीड दिवस मुक्कामास आलेल्या गणरायांना ‘पुढच्या वर्षी लवकर या...’ अशी विनंती करुन अत्यंत भावपूर्ण वातावरणात जिल्ह्यातील ५ समुद्र किनारी, ३० तलाव, १९ नदी किनारी आणि दोन खाडी किनारी निरोप देण्यात आला. दीड दिवसाच्या १२ सार्वजनिक तर २४ हजार २६४ घरगुती गणपतींचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले.2विसर्जन मिरवणुकीच्या वेळी मोठ्या आवाजाच्या डीजे सिस्टीमऐवजी पारंपरिक वाद्यांच्या तालावर भजने म्हणत गणरायांना निरोप देण्याची मानसिकता यंदा मोठ्या प्रमाणात दिसून आली. शासनाने निश्चित केलेल्या ‘ना आवाज’ क्षेत्रात वाद्ये देखील वाजविण्यात आली नाहीत. स्वेच्छेने शिस्तपालन करण्यात आल्याने पोलिसांचे काम कमी झाले. गणेशोत्सवापूर्वी घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकांमुळे गणेशभक्तांनी नियमांचे पालन के ले.3गणेश विसर्जनाच्या मिरवणुका व अन्य कारणास्तव अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस सूत्रांनी दिली. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनानंतर रात्री मोठ्या प्रमाणात गणेशभक्त मुंबईकडे निघण्याची शक्यता विचारात घेऊन परतीच्या सुकर प्रवासाकरिता गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतुकीतील व्यत्यय टाळण्यासाठी गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आली.