शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून नदीप्रवाहातून अंत्ययात्रा; खालापुरातील वाडीवरील घटना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 09:27 IST

स्मशानभूमी, पुलाचा प्रश्न ऐरणीवर, या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मोहोपाडा : राज्यातील आदिवासी वाड्यांवरील स्मशानभूमींचा प्रश्न वर्षांनुवर्षे कायम असतानाच वेगवान नदीप्रवाहातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ आल्याची विदारक घटना खालापूर तालुक्यात बुधवारी घडली. या घटनेचे आता तीव्र पडसाद उमटत आहेत. 

खालापूरमधील २३७ उंबऱ्याच्या आरकसवाडीतील कमळ चौधरी (वय ५८) यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. या वाडीसाठीची स्मशानभूमी पिरकटवाडी नदीच्या पलीकडे आहे. मात्र, जोरदार पावसामुळे रात्रीपासूनच या नदीचा प्रवाह वाढला होता. त्यामुळे ग्रामस्थांसमोर अंत्यविधी कसा करणार, असा प्रश्न उभा ठाकला. त्यामुळे त्यांनी दुसरा दिवस उजाडण्याची प्रतीक्षा केली. त्यानंतर नदीच्या प्रवाहाचा वेग कमी होत नसल्याने अखेर या धोकादायक प्रवाहातून कमळ चौधरी यांची अंत्ययात्रा काढली. 

व्हिडिओ व्हायरल 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आरकसवाडी - पिरकडवाडी आदिवासी वाड्यांना जोडण्यासाठी नदीवर पूल नाही. त्यामुळे दोन्ही वाड्यांतील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून यामधून प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांना शाळेतही अशाच प्रकारे जीव धोक्यात घालून जावे लागते, असे ग्रामस्थ रवींद्र चौधरी यांनी सांगितले. या स्थितीचे कुणालाही सोयरसुतक नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पुलाचे भूमिपूजन, वीटही रचली नाही

उंबरणेवाडी, पिरकडवाडी आणि आरकसवाडी येथील आदिवासी समाजाने अनेक वर्षांपासून पिरकडवाडी नदीवर पूल बांधण्याची वारंवार मागणी केली आहे. मात्र, या पुलाच्या कामाचे पाच महिन्यांपूर्वी केवळ नावापुरते भूमिपूजन करण्यात आले. आतापर्यंत येथे एक दगडही ठेवलेला नाही. शाळाही नदीपलीकडे पिरकटवाडीत असल्यामुळे लहानग्यांना याच नदीच्या प्रवाहातून जीव मुठीत घेऊन जावे लागते. आजारी रुग्णासही नदीतूनच न्यावे लागते. पावसाळ्यात नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर उपचारासाठी येत नसल्याने काहींना जीवही गमवावा लागला आहे.   

आरकसवाडी आदिवासीवाडीत व्यक्ती आजारी पडल्यास तिला नदी ओलांडून पाण्यातून पलीकडे न्यावे लागते. पावसाळ्यात नदीची पाणीपातळी वाढत असल्याने रुग्णालयात नेण्यास उशीर होत असल्याने काहींना जीव गमवावा लागला आहे. - संदीप निरगुडा, पिरकटवाडी ग्रामस्थ.

 

टॅग्स :Rainपाऊस