शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये दिवाळी निमित्ताने  विनामुल्य रांगोळी प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2023 14:40 IST

नवोदित कलाकारांनी रेखाटल्या विराट कोहली, श्यामची आई,साधू आदि व्यक्तिंच्या आकर्षक रांगोळ्या.

मधुकर ठाकूर, उरण: दिवाळी सणाचे औचित्य साधून उरणमध्ये रंगवल्ली कला दर्शन संस्थेच्यावतीने मोफत रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले आहे.१२ ते १९ ऑक्टोंबर पर्यंत सलग ८ दिवस आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात विराट कोहली, श्यामची आई, साधू  आदिंची आकर्षक व्यक्ती चित्र रेखाटण्यात आली आहेत. रविवारपासून सुरू झालेले रांगोळी प्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींनी सकाळपासूनच गर्दी केली आहे.

उरण शहरातील एनआय हायस्कूलमध्ये रंगवल्ली कला दर्शन संस्थेच्यावतीने दुसऱ्या वर्षीही मोफत रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी हे रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले असल्याची माहिती कलावंत राजेश नागवेकर यांनी दिली.या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ कलाकारांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.या विनामुल्य रांगोळी प्रदर्शनात नंदकुमार साळवी, सिद्धार्थ नागवेकर, संतोष डांगर, नवनीत पाटील, सत्या कडू, संतोष पाटील, राजेश नागवेकर,  स्वप्नाली मंचेकर आदी कलाकारांनी १३ आकर्षक  रांगोळ्या रेखाटल्या आहेत.

यामध्ये सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली, श्यामची आई, साधू आदिवासी मुलगी, साधू, लहान मुलगी, वाघाचे पिल्लू ,पक्षी, गणपती, राधाकृष्ण आदी व्यक्ती चित्र, लॅण्डस्केप आदी विविध प्रकारच्या चित्रांचा या रांगोळी प्रदर्शनात समावेश आहे. यामधे विशेष म्हणजे ७८ वर्षीय सेवा निवृत्त कलाशिक्षक नंदकुमार साळवी यांनी ९ फुट बाय ६ फुट आकाराचा गालीचा आणि थ्री डी रांगोळी प्रदर्शनातील आकर्षण ठरली आहे.आकर्षक रांगोळी प्रदर्शन पाहण्यासाठी कलाप्रेमींची रविवारपासूनच मात्र गर्दी वाढत चालली आहे.

टॅग्स :uran-acउरण