शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळा घाटात चार ओएफसी केबल जेसीबीने तोडल्या, बीएसएनएल इंटरनेट सेवा पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 19:19 IST

अलिबाग- मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे दरम्यानच्या चार आॅप्टिकल फायबर केबल्स(ओएफसी) खंडाळा ते लोणावळ्यादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरील जेसीबीने खोदकामादरम्यान तोडल्या आहेत.

- जयंत धुळपअलिबाग- मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे दरम्यानच्या चार आॅप्टिकल फायबर केबल्स(ओएफसी) खंडाळा ते लोणावळ्यादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरील जेसीबीने खोदकामादरम्यान तोडल्या आहेत. पुणे-पनवेल ही संपूर्ण रायगड जिल्ह्यास इंटरनेट सेवा देणारी मुख्य व एकमेव ओएफसी केबल पूर्णपणे तुटली असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 100 टक्के ठप्प झाली आहे. परिणामी जिल्ह्यातीस सर्व सरकारी आॅनलाइन सेवा; बँकांच्या आॅनलाइन सेवा आणि एटीएम सेवा ठप्प झाल्याने जनसामान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे आॅनलाइन प्रवेश अर्ज दुपारपासून भरता येत नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या दहावीचा निकाल आहे; तो तरी मिळणार का अशी चिंता पालक व विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली. बीएसएनएल इंटरनेट 100टक्के बंद आणि त्याच वेळी खासगी कंपन्यांचे पूर्ण वेगात सुरू; या परिस्थितीमुळे जनसामान्य बीएसएनएलच्या कार्यप्रणालीबाबत शंका व्यक्त करीत आहेत. इतकी महत्त्वाची ओएफसी केबल जेथे आहे; तेथे खोदकाम होणार आहे; याची पूर्वकल्पना बीएसएनएलला देण्यात आली नव्हती का? दिली असल्यास त्या ठिकाणी बीएसएनएलचे जबाबदार अधिकारी उपस्थित होते का नव्हते; याची चौकशी तत्काळ करून दोषींवर कारवाई करावी आणि जिल्ह्यातील जनसामान्यांना सांगावी, अशी संतप्त प्रतिक्रिया बीएसएनएल ग्राहक अनंत देवळे यांनी दिली आहे.दरम्यान, खंडाळा घाटात ब्रेक झालेली ओएफसी जोडण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे. लवकरच सेवा पूर्ववत सुरू होईल अशी माहिती रायगड बीएसएनएल चे महाव्यवस्थापक सी. व्ही. राव यांनी दिली आहे.