शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

महाड शहरातील चार इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 00:03 IST

नगरपालिकेने बजावल्या नोटिसा: ४३ नागरिकांना इमारत सोडण्याच्या सूचना

सिकंदर अनवारे दासगाव : मुंबईमधील इमारती कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर राज्य शासन जागे झाले असून सर्वच शहरातील धोकादायक इमारतींचा मुद्दा आता समोर आला आहे. महाड शहरात देखील अशा प्रकारच्या चार इमारती असून या इमारतीमधील ४३ जणांना महाड नगरपालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या इमारती अल्पावधीतच रहिवाशांना सोडाव्या लागल्या आहेत.

मुंबईतील डोंगरी भागात रहिवासी इमारत कोसळून दुर्घटना घडल्यानंतर शासन जागे झाले आहे. रायगड जिल्ह्यात देखील विविध शहरात अशा प्रकारच्या धोकादायक इमारती असल्याची आकडेवारी जिल्हाधिकारी यांनी सादर केली होती. यामध्ये महाड शहरात ४३ इमारती धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात महाड शहरात फक्त चार इमारती धोकादायक आहेत. या चार इमारतीमधील ४३ रहिवाशांना महाड नगरपालिकेने महाराष्ट्र नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये इमारती सोडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये पालिकेने या इमारती धोकादायक असून रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे सांगून आपले हात वर केले आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पालिकेची आहे, मात्र पालिकेकडून नवीन इमारती बांधकाम होत असताना दुर्लक्ष केले जात असल्याने अल्पावधीतच या इमारती धोकादायक बनल्या आहेत.

महाड शहरातील सिटी सर्व्हे क्रमांक १९१/१अ, सिटी सर्व्हे क्रमांक २८८७, १५३, यामधील इमारतींचा समावेश आहे. गोकु लेश गृहनिर्माण, गणेश अपार्टमेंट, जीवन सिद्धी अपार्टमेंट आणखी एका इमारतीचा समावेश आहे. या इमारती दहा ते पंधरा वर्षातच कोसळण्याच्या अवस्थेत आल्या आहेत. यामुळे या तीन इमारतीमधील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. यातील गोकुलेश अपार्टमेंट ही तर अवघ्या सात आठ वर्षातच धोकादायक स्थितीत गेली आहे. या इमारतीचे पिलर खचल्याची बाब समोर आली होती.

इमारती कमकुवतनवीन इमारत बांधकाम करत असताना प्रथम त्याचे डिझाईन आरेखकामार्फत पालिकेला सादर केले जाते. आरेखक पालिका नियमाला अनुसरून परवानगी काढून घेतो आणि त्यानंतर इमारत बांधकाम होत असताना बांधकाम मजूर, ठेकेदार यांच्यावर निर्भर राहतो. महाड नगरपालिकेकडून देखील शहरात होणारे बांधकाम याबाबत योग्य ती काळजी घेतली जात नाही. प्रत्यक्षात कोणत्या दर्जाचे सामान वापरले जात आहे, इमारत परवाना दिल्याप्रमाणे बांधकाम होते की नाही याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच अशा प्रकरच्या घटनांना सामोरे जाण्याची पाळी येत आहे.