शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाने पुसली गावाची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 23:25 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पेण तालुक्यातील गडब गावाची ओळखच पुसली गेली आहे.

- प्रदीप मोकल वडखळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात पेण तालुक्यातील गडब गावाची ओळखच पुसली गेली आहे. सध्या येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सुमारे दहा हजारांची लोकसंख्या असलेले गडब गाव वसले आहे. महसूल व सरकार दरबारी या गावाचे नाव काराव आहे. या ठिकाणी पाच पाडे आहेत. जांभेळा, चिर्बी, घाट, मांचेळा, मौजे या पाड्याचे मिळून झालेल्या गडब गावाच्या वेशीवर हनुमान मंदिर व त्याच्या बाजूला दगडी शाळा होती. मात्र महामार्गाच्या चौपदरीकरणात या वास्तूच नेस्तनाबूत झाल्याने गावाची ओळखच पुसली गेली आहे. येथील हनुमान जयंतीचा उत्सव तालुक्यात प्रसिध्द आहे. जांभेळा, चिर्बी, घाट, मांचेळा, मौजे येथील ग्रामस्थ दर पाच वर्षांनी आळीपाळीने हा उत्सव साजरा करीत. मात्र चौपदरीकरणात मंदिर तसेच समोरील अंगण गेल्याने उत्सव साजरा करताना अडचण निर्माण होणार आहे. तर गोपाळ काल्याला मंदिराचे प्रांगणातच श्रीकृष्ण लीला सादर केली जायची. अनेक कलाकारांना कला सादर करण्यासाठी हे हक्काचे व्यासपीठ होते. येथील नृसिंह सरस्वती महाराज मंदिर देखील महामार्गाच्या चौपदरीकरणात नेस्तनाबूत झाले आहे. या ठिकाणी अनेक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्र म केले जायचे, मनोरुग्णावर उपचारही केले जायचे. दगडी शाळेचे विस्तारीकरण करण्यात आले होते. यात व्यायामशाळाही सुरू करण्यात आली होती. ही शाळाही जमीनदोस्त करण्यात आली आहे.>पाण्याची समस्या बिकटचौपदरीकरणात येथील तीन विहिरीही बुजवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या बिकट होण्याची शक्यता आहे. गडब गावाला जेएसडब्लू कंपनीतून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी जर कंपनीतून पाइपलाइनद्वारे पाणी सोडले नाही तर विहिरीतील पाणी ग्रामस्थांना मिळत होते, परंतु आता चौपदरीकरणात विहिरी गेल्याने येथील पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे.>कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्राला फटकामहामार्गाचे चौपदरीकरणात येथील मराठी शाळेचे क्रीडांगण गेले आहे. विविध क्रीडा स्पर्धांतील खेळाडू याठिकाणी सराव करायचे. मात्र आता सरावासाठी क्रीडांगणच नसल्याने खेळाडूंमध्ये नाराजी दिसून येत आहे. या ठिकाणी असलेल्या शाळेच्या व्यासपीठावर अनेक सांस्कृतिक कार्यक्र म केले जायचे, तेही आता होऊ शकणार नाही. मराठी शाळा एकदमच महामार्गावर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.