शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

साळोखेतील अनधिकृत वराह पालन शेडवर वनविभागाचा हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 23:27 IST

कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नारळेवाडी येथील वन जमिनीवरील अनधिकृतपणे उभारलेल्या वराह पालन शेडवर वन अधिकाऱ्यांनी कारवाई करून जमीनदोस्त केले.

नेरळ : कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नारळेवाडी येथील वन जमिनीवरील अनधिकृतपणे उभारलेल्या वराह पालन शेडवर वन अधिकाऱ्यांनी कारवाई करून जमीनदोस्त केले.जेसीबीच्या साहाय्याने शेडचे बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य, १२५ पत्रे, ५४२ लोखंडी पाइप त्याचप्रमाणे १००० लिटरच्या पाण्याच्या टाक्या इत्यादी बांधकाम साहित्य जप्त केले. तसेच शेड मालकावर वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही वर्षांपासून नारळेवाडी परिसरात मुंबईतील धनिक जोसेफ डिसोझा व पियर डिसोझा यांनी आदिवासी जमीन खरेदी करून त्यावर बेकायदेशीररीत्या शेड बांधली होती. त्याठिकाणी वराह पालनचा व्यवसाय सुरू केला आहे. सदरच्या जमिनीचा खातेदार आदिवासी असून सातबारा उताऱ्यावर (सर्व्हे नंबर ७४/२) महाराष्ट्र शासन खाजगी वने, अशी नोंद आहे. असे असतानाही वनविभागाची कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी नसताना स्थानिक ग्रामपंचायतीच्या परवानगीने त्या जागेवर पक्के दोन शेड उभारले. त्या ठिकाणी वराह पालनाचा व्यवसाय करत होते.वराह पालनामुळे होणाºया दुर्र्गंधीमुळे परिसरातील ग्रामस्थांना त्रास होत असून यास स्थानिकांचा विरोध आहे. शेडमधून निघणाºया मलयुक्त घाणीचे कोणत्याही प्रकारची प्रक्रि या करून विल्हेवाट न लावल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यात तर हेच मलयुक्त घाण पाण्याच्या प्रवाहात परिसरातील नदी नाल्यात जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आल्याचे गावकऱ्यांचे यांचे म्हणणे आहे. त्याकरिता साळोख येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रार केली होती. साळोख येथील तंटा मुक्ती अध्यक्ष शोएब बुबेरे यांनी वन विभागाकडे तक्रार केल्यावर कारवाई केली.>मागील आठ वर्षा पासून हा अवैध वराह पालनचा व्यवसाय सुरू असून त्याच्या घाणीपासून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. आम्ही ग्रामस्थांनी संबधित विभागास वारंवार तक्र ार करूनही काही कारवाई होत नव्हती. अखेर आता कारवाई झाली आहे.- शोएब बुबेरे, तंटा मुक्ती अध्यक्ष>नारळेवाडी येथील वन विभागाच्या जागेवर उभारलेल्या वराह पालन शेड विषयी तक्र ार आली असता वरिष्ठ अधिकाºयांच्या आदेशाने सदरचे शेड पाडण्यात आले आहे. सध्या शेडमध्ये असलेल्या जनावरे स्थलांतरित करण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली असून त्यानंतर दुसरे शेडही हटविण्यात येईल. या संबंधी शेड मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरू आहे.- जयवंत सुपे, वनपाल-पोही