शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

६१४ शाळांना सरकारकडून फुटबॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 02:38 IST

सतरा वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपचा थरार भारतात होणार आहे. या वर्ल्ड कपचे प्रमोशन म्हणजे हा खेळ भारतातील युवकांनी खेळावा.

आविष्कार देसाई ।अलिबाग : सतरा वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपचा थरार भारतात होणार आहे. या वर्ल्ड कपचे प्रमोशन म्हणजे हा खेळ भारतातील युवकांनी खेळावा. यासाठी महाराष्ट्रातील २० हजार शाळांना एक लाख फुटबॉल सरकार देणार आहे. रायगड जिल्ह्यातील ६१४ शाळांना तीन हजार ७० फुटबॉल प्राप्त होणार आहेत. एकीकडे राज्यातील पारंपरिक आणि आपल्याच मातीतील खेळांवर सरकारचे योग्य लक्ष नसल्याची झोड उठत असतानाचा आता सरकारने फुटबॉलवर मेहरनजर दाखवली असल्याचे बोलले जाते.फिफा या संघटनेने ६ ते २८ आॅक्टोबर २०१७ या कालावधीमध्ये भारतात या खेळांच्या स्पर्धा भरवल्या आहेत. महाराष्ट्रात फक्त पाच सामने खेळवले जाणार आहेत. नवी मुंबई येथील डी.वाय.पाटील स्टेडियममवर या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपबाबत वातावरण निर्माण व्हावे यासाठी सरकारने प्रत्येक शाळांना पाच फुटबॉल देण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शाळांची माहिती मागितली आहे. त्यामध्ये शाळांची संख्या, किती शाळांमध्ये मैदाने आहेत याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.रायगड जिल्ह्यातील ६१४ शाळांना प्रत्येकी पाच म्हणजेच तीन हजार ७० फुटबॉल देण्यात येणार आहेत. यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे क्रीडा अधिकारी राठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबतची उच्च स्तरीय बैठक २० आॅगस्ट रोजी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आठ शाळांमध्ये खेळाची मैदाने आहेत. खालापूर तालुक्यात दोन, अलिबाग तालुक्यात एक, मुरु ड तालुक्यात एक, उरण तालुक्यात एक आणि रोहा तालुक्यात तीन अशी एकूण १६ मैदाने आहेत. राष्ट्रीय खेळांकडे सरकार पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नसल्याने ते खेळ लोप पावत आहेत, तर दुसरीकडे सरकार विदेशी खेळांना प्रमोट करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.