शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

पर्यटन व्यवसायातील वृद्धीसाठी पायाभूत सुविधांवर भर; किनारा सुशोभीकरणावरही लक्ष केंद्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 23:46 IST

पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यावर अलिबाग नगरपालिकेने विशेष भर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे पर्यटन व्यवसायाला नवा आयाम मिळून आर्थिक गतिमानता लाभण्यास मदत होईल.

- आविष्कार देसाईअलिबाग : पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यावर अलिबाग नगरपालिकेने विशेष भर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे पर्यटन व्यवसायाला नवा आयाम मिळून आर्थिक गतिमानता लाभण्यास मदत होईल.शहरात अंतर्गत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी नगर परिषदेने सुमारे ४५० मीटरचे काँक्रीटचे रस्ते निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी तब्बल २ कोटी ५४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत, तर डांबरीकरणासाठी सुमारे ७१ लाख रुपये खर्च करून सुमारे १,२८० मीटरच्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहेत.अलिबागमध्ये वर्षभर पर्यटक येत असतात. मुंबई-पुण्यासाठी राज्यातील अन्य भागांतूनच नव्हे तर विदेशी पर्यटकही याठिकाणी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे येथील हॉटेल, लॉजिंग, रेस्टारंट, कॉटेजेस यांचा व्यवसाय तेजीत असतो. पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा योग्यरीतीने दिल्या तर, पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होईल. त्यादृष्टीने नगर परिषदेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.पर्यटकांना पर्यटनस्थळी पोचण्यासाठी प्रामुख्याने पायाभूत सुविधांची अत्यंत गरज असते. त्यामुळे रस्ते सुस्थितीत करण्यावर भर दिला आहे. अलिबाग तालुका एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येतो. याच एमएमआरडीच्या माध्यमातून रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच डांबरीकरणाचे काम संपवण्यात आले आहे. त्यामुळे रस्ते दीर्घकाळापर्यंत टिकण्याचा प्रशासनाने दावा केला आहे.सिमेंट काँक्रीटचे रस्तेसेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल ते मारुती मंदिर-चेंढरे२०० मीटर । एक कोटी २२ लाख रुपयेबालाजी नाका ते महावीर चौक२५० मीटर । एक कोटी ३२ लाख रुपयेडांबरीकरणातून उभारण्यात आलेले रस्तेशेतकरी भवन ते ठिकरुळ नाका३०० मीटर । १८ लाख रुपयेब्राम्हण आळी ते राम मंदिर२५० मीटर । १२ लाख रुपयेमहावीर चौक ते राम मंदिर१६० मीटर । ७ लाख रुपयेतळकर नगर ते राम मंदिर१६० मीटर । ७ लाख रुपयेजिल्हा परिषद ते तुषार सरकारी विश्रामगृह६० मीटर । ४ लाख रुपयेपत्रकार भवन ते जेएसएम कॉलेज मैदान, समुद्र किनारा५० मीटर । ३ लाख रुपयेजुने भाजी मार्केट-पापाभाई पठाण चौक ते नवीन पोस्ट आॅफिस३०० मीटर । १८ लाख रुपये

टॅग्स :alibaugअलिबाग