शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
3
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
4
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
5
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
6
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
7
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
8
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
9
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
10
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
11
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
12
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
13
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
14
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
15
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
16
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
17
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
18
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
19
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
20
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या

रेल्वेसाठी आरसीएफची जुनीच लाइन सोयीस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:51 IST

२३५ कोटींच्या खर्चाला तत्वत; मान्यता : केंद्रीय मंत्र्यांची वरसोली गावाला भेट

अलिबाग : अलिबागकरांसाठी बहुप्रतीक्षेत असलेल्या रेल्वेसाठी नव्याने जमिनीचे संपादन करण्यात येणार नाही, मात्र आरसीएफ कंपनीच्या रेल्वे लाइनवरूनच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. जुन्या रेल्वे मार्ग जोडणीला तब्बल २३५ कोटी रुपयांच्या खर्चाला रेल्वे मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिली.अलिबाग तालुक्यातील पर्यटकांसाठी प्रकाशझोतात आलेल्या वरसोली या पर्यटनस्थळाची पाहणी गीते यांनी केली. वरसोली गावात आवश्यक असलेल्या जेटीचा नव्याने विकास करण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री गावात आल्याचे कळताच नागरिकांनी त्यांची भेट घेतली. गावात भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा पाढाच त्यांनी गीते यांच्यासमोर वाचला. वरसोली गावातील सी.आर.झेड, मच्छीमारांचे विविध प्रश्न, रेल्वे संदर्भात असलेल्या नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन अनंत गीते यांनी केले. मच्छीमारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या त्रैमासिक बैठकीत त्यावर लवकरच उपाययोजना करण्यात येणार असल्याचे गीते यांनी उपस्थितांना सांगितले.येथे कोळी समाज हा मोठ्या संख्येने आहे. त्यांची बहुतांश घरे आणि मासळी सुकवण्याचे ओटे हे समुद्र किनारीच आहेत. सीआरझेड कायदा हा त्यांच्यासाठी जाचक ठरत आहे. या समाजाची येथे पूर्वीपासूनची घरे आहेत. सरकार, प्रशासन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. उलट त्यांच्याकडून कारवाईचा बडगा उगारला जातो असे, सरपंच मिलिंद कवळे यांनी गीते यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत सह्याद्रीवर संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असेही गीते यांनी कोळी समाजाला आश्वासित केले.अलिबाग रेल्वेने जोडावे अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर अलिबागला रेल्वे आणण्यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने अलिबागकरांच्या हितासाठी योग्यतोच निर्णय घेतला. आता नवीन जागा संपादित करणे सोपे राहिलेले नाही. आरसीएफ कंपनीची जुनी रेल्वे लाइन वापरता येईल का याची पडताळणी केली. त्यानंतर आरसीएफ कंपनी प्रशासनाने या संदर्भात होकार दर्शविला होता. आता लवकरच आरसीएफ कंपनी प्रशासन आणि रेल्वे मंत्रालय यांच्यात करार होणार आहे. या जुन्या रेल्वे मार्ग जोडणीला सुमारे २३५ कोटी रु पयांचा खर्च येणार आहे. त्या खर्चाला रेल्वे मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिल्याचेही गीते यांनी सांगितले.याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय कवळे, महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, कामगार नेते दीपक रानवडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.वरसोलीतील जमीन होणार होती संपादितरेल्वे आणण्यासाठी वरसोली येथील जमीन मोठ्या प्रमाणात संपादित होणार होती. त्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना होणार होता. कमीत कमी विस्थापन करून सर्वांचीच जमीन वाचवावी, अशी आग्रही भूमिका सरपंच मिलिंद कवळे यांच्यासह त्यांचे वडील विजय कवळे यांनी घेतली होती.परंतु २०१४ च्या निवडणुकीनंतर आघाडीची सत्ता गेली आणि युतीची सत्ता आली. त्यामुळे सत्ताधाºयांना जवळ केल्यास यातील प्रश्न मार्गी लागतील याची पक्की खात्री विजय कवळे यांनी होती. त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेचे धनुष्य हातात घेतले. त्यानंतर सूत्र हलली आणि वरसोलीकरांना जे अपेक्षित होते तेच झाल्याची चर्चा आहे.अद्याप असे कोणतेच नोटीफिकेशन आलेले नाही. रिजनल प्लॅनला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. रेल्वे सुरू झाल्यावरच ती लवकरच होईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. रेल्वे मंत्रालयाला आरसीएफ कंपनीच्या जुनी रेल्वे लाइनचा वापर करता येणार असल्याने त्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची बचत होणार आहे. यामध्ये वरसोलीकरांचा फायदाच आहे.- मिलिंद कवळे, सरपंच,वरसोली ग्रामपंचायत

टॅग्स :railwayरेल्वे