शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमारांचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: June 15, 2016 01:07 IST

पिढ्यानपिढ्या समुद्रकिनारी असणाऱ्या सरकारी जमिनीचा वापर मच्छीमार समाज करीत आला आहे, परंतु सरकारी जमिनीमध्ये अतिक्रमण केले आहे त्यांनीच कोळी बांधवांना

- आविष्कार देसाई, अलिबाग

पिढ्यानपिढ्या समुद्रकिनारी असणाऱ्या सरकारी जमिनीचा वापर मच्छीमार समाज करीत आला आहे, परंतु सरकारी जमिनीमध्ये अतिक्रमण केले आहे त्यांनीच कोळी बांधवांना या जागेतून हुसकाविण्याची तयारी प्रशासन आणि सरकारच्या पाठबळावर केली आहे. त्यामुळे हे सरकार धनदांडग्यांचे आहे की, सर्वसामान्यांचे असा प्रश्न अलिबाग तालुक्यातील चाळमाळ-थळ येथील मच्छीमार समाजाला पडला आहे.अलिबागपासून रेवस आणि मांडवा या पट्ट्यामध्ये ‘लॅवीश लाइफस्टाइल’ जगणाऱ्या धनदांडग्यांचे शेकडो बंगले, फार्महाऊसेस आहेत. समुद्र किनाऱ्याला लागूनच त्यांच्या प्रॉपर्टी आहेत. प्रशासनाने डोळेझाक केल्यानेच या धनदांडग्यांनी सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करुन सरकारच्या जागा गिळंकृत के ल्याआहेत. मासळी सुकविणे, बोटींची दुरुस्ती करणे, जाळे विणणे, गुरे चरविणे या कामांसाठी सरकारी जमिनींचा वापर करण्यापासून कोळी बांधवांना कोणी रोखू शकत नाही. सरकारने ५ फेब्रुवारी १९८३ रोजी तसा निर्णयही दिला आहे. त्यानुसार ही जागा मत्स्य व्यवसायासाठी राखीव ठेवून त्या मच्छीमार समाजाच्या नावे करावी. याबाबतचा आदेश ३० एप्रिल २०१२ रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांना कोकण मत्स्य व्यवसाय आयुक्तांमार्फत देण्यात आले आहेत. असे असताना त्या सरकारी जमिनीवरून हुसकावण्याची तयारी धनदांडग्यांनी प्रशासनाच्या मदतीने केली आहे. सचिन भास्कर कदम आणि रणदीपसिंग मुजराल यांनी याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने संबंधितांना अतिक्रमणे काढण्याबाबत आदेश दिले आहेत. अतिक्रमणे हटविण्याबाबतच्या नोटिसा मच्छीमार समाजाला देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार असे दिसताच मच्छीमार समाज एकवटला. त्यांनी मंगळवारी शेकाप आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला. मच्छीमार समाजाला त्यांच्या जागेतून कोणीच काढू शकत नाही, असे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.प्रशासनाकडे तक्रारीअलिबागमधील चाळमाळ-थळ सर्व्हे नंबर ३४५ आणि ३४६ ही जागा मच्छीमार समाजाची आहे. परंतु याच जमिनीवर तेथील धनदांडग्यांनी आपली वक्रदृष्टी केली आहे. या जमिनीवर मच्छी सुकविण्याचे ओटे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे तेथे मासळी सुकविली जाते. यामुळे वासाचे कारण देत धनदांडग्यांनी ती जमीन घशात घालण्यासाठी हा खटाटोप केला असावा. कारण याआधीही त्यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले आहे. त्या बाबतीमध्ये ३१ सप्टेंबर २००५ सालापासून जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्याचे हनुमान मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मदन कोळी यांनी सांगितले. मच्छीमार समाजाला त्यांच्या जागेतून कोणीच काढू शकत नाही, असे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.ग्रामसभेत ठराव थळ ग्रामपंचायतीनेही ३१ आॅगस्ट २००५ रोजी ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे. मासळी सुकविण्याची जागा मच्छीमार समाज पिढ्यानपिढ्या वापरत आहे. त्यामुळे ती जमीन त्यांना वापरण्यास द्यावी, असा ठराव करण्यात आला आहे.आयुक्तांमार्फत आदेश जागा मत्स्य व्यवसायासाठी राखीव ठेवण्याचे आदेश ३० एप्रिल २०१२ रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकाऱ्यांना कोकण मत्स्य व्यवसाय आयुक्तांमार्फत देण्यात आले आहेत.लोकायुक्तांच्या निर्देशानुसार प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कारवाईला सुरुवात केली आहे. मच्छीमारांनी समुद्रकिनारी शेड बांधायला सुरुवात केली आहे. बंगलेधारकांनी अतिक्रमण केलेल्या तक्रारीवर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.- प्रकाश सकपाळ, तहसीलदार, अलिबाग