शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळात मच्छीमारांचे एक कोटीचे झाले नुकसान; मच्छीमारांमध्ये असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 02:24 IST

पुरेसा निधी नसल्याने मदत वाटप रखडले

आविष्कार देसाईरायगड : जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळात मासेमारी करणाऱ्यांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने अद्याप नुकसानभरपाईसाठी पुरेसा निधी दिलेला नाही. त्यामुळे मदत वाटप रखडल्याने मच्छीमारांमध्ये असंतोष खदखदत आहे.

३ जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील सव्वा लाख घरांचे नुकसान केले, तर हजारो हेक्टरवरील बागायतींचे क्षेत्र नष्ट झाले. काही तासांच्या वादळाने होत्याचे नव्हते केले. निसर्ग चक्रीवादळाचा फटका हा समुद्रकिनारी असणाºया तालुक्यांना बसला आहे. त्यामुळे येथील मासेमारी करणाºया समाजातील होड्या, मासेमारीच्या जाळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, मुरुड, तळा, अलिबाग, पेण, कर्जत आणि उरण तालुक्यातील सात हजार ९६ होड्यांचे अंशत: तर ३० होड्यांचे पूर्णत: असे एकूण ७,१२६ होड्यांचे नुकसान झाले आहे. ६१ जाळ्यांचे अंशत: आणि आठ जाळ्यांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने शेततळी आहेत. ६३.८० हेक्टरवरील मत्स्य खाद्य खराब झाले, तर ३.६० हेक्टर क्षेत्रातील शेततळ्यांची बांधबंदिस्ती तुटली आहे.

सरकारने तातडीने मासेमारी करणाºया समाजाला नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या कालावधीतच आम्ही आमच्या होड्यांची डागडुजी करत असतो, तसेच जाळी विणण्याचेही काम याच कालावधीत केले जाते. त्यामुळे आॅगस्ट महिन्यामध्ये पुन्हा नव्या जोमाने मासेमारी करायला जाता येईल. गेल्या काही वर्षांपासून मासळीचा दुष्काळ पडत आहे. गेल्या आणि आताच्या वर्षात किमान नऊ वादळे येऊन गेली; मात्र आम्हाला कोणीच मदत केली नाही. निसर्ग वादळाने अन्य विभागांचे नुकसान झाल्याने त्यांना तातडीने मदत देण्यात येत आहे. मात्र आम्हाला मागे ठेवले जाते. आता तरी सरकारने मदत देणे गरजेचे आहे, असे मांडवा येथील माता टाका देवी मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष अनिल भिंगारकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.मासेमारी करणाऱ्यांच्या होड्या, जाळ्यांसह अन्य नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण झाले आहेत. प्रशासनाकडे सध्या ५० टक्केच निधी आहे. उर्वरित रक्कम लवकरच प्राप्त होईल. मदत वाटप करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाला २० लाख रुपये प्राप्त झाले होते, त्यापैकी १८ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. - पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड९६ लाख ६० हजार ३६४ रुपयांचे पंचनामे पूर्णमत्स्य विकास विभागाने ९६ लाख ६० हजार ३६४ रुपयांचे नुकसान झाल्याबाबत पंचनामे पूर्ण केले आहेत. मात्र, नुकसानभरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे नसल्याने मदत वाटप रखडले असल्याचे बोलले जाते. जुन्या सरकारी निर्णयानुसार अंशत: नुकसान झालेल्या एका होडीला चार हजार रुपये, तर पर्ू्णत: नुकसान झालेल्या होडीसाठी नऊ हजार ६०० रुपये सरकारने मंजूर केले होते.

तसेच अंशत: जाळ्याच्या नुकसानीसाठी दोन हजार १०० तर पूर्णत:साठी दोन हजार ६०० रुपये नुकसानभरपाईची रक्कम आहे. मात्र आता नवीन निर्णयानुसार अंशत: नुकसान झालेल्या एका होडीला १० हजार रुपये तर पूर्णत: नुकसान झालेल्या होडीला २५ हजार रुपये मिळणार आहेत. तसेच अंशत: जाळीला पाच हजार आणि पूर्णत: तुटलेल्या एका जाळीलाही पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ