शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पर्सेसीनविरोधात एकवटले मच्छीमार, सागरी आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:30 IST

पर्सेसिन नेट आणि एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणारा मच्छीमार आर्थिक संकटामध्ये सापडला आहे, अशा पद्धतीच्या मासेमारीमुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होणार आहेत.

- आविष्कार देसाईअलिबाग : पर्सेसिन नेट आणि एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणारा मच्छीमार आर्थिक संकटामध्ये सापडला आहे, अशा पद्धतीच्या मासेमारीमुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. निसर्ग आणि पारंपरिक मच्छीमार जगला पाहिजे, यासाठी कोकणातील कोळी समाज एकवटला जात असून ठिकठिकाणी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कुलाबा किल्ला परिसरात सुमारे चार हजार बोटी घेऊन महाकाय सागरी आंदोलन छेडण्यात येणार आहे.पर्सेसिन नेट आणि एलईडी मासेमारीवर पूर्णपणे निर्बंध आणावेत, शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे कर्जमाफी दिली जाते, त्याचप्रमाणे मासळीचा दुष्काळ जाहीर करून मच्छीमारांना आर्थिक संरक्षण द्यावे. या प्रमुख मागण्यांसाठी प्रशासन आणि सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने मच्छीमारांनी २३ एप्रिल रोजी आंदोलन पुकारले आहे. जय मल्हार कोळी समाज संस्थेच्या नेतृत्त्वाखाली कोकणातील मच्छीमार समाज एकवटणार आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील कोळीवाड्यांमध्ये खंडोबाला साक्ष ठेवून आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे. मच्छीमार समाज आणि मासेमारीवर अवलंबून असणाºयांचा बैठकांना भरभरून प्रतिसाद लाभत आहे.चार हजार बोटी सहभागी होणाररायगड जिल्ह्यापुरताच हा प्रश्न केवळ मर्यादित नाही, तर तो संपूर्ण कोकणातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाºयांना भेडसावणारा आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचीही हानी होणार आहे. अलिबाग कुलाबा किल्ल्याच्या पाठीमागील समुद्रामध्ये कोकणातील सुमारे चार हजार बोटी या महाकाय सागरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. २३ एप्रिलच्या आंदोलनाबाबत प्रशासनाला रीतसर पत्र दिले आहे.बोटी फोडण्याचा इशारासागरी आंदोलनामध्ये सुमारे चार हजार बोटी सहभागी होणार आहेत. त्यामुळे आंदोलनाची धार अधिक तीव्र झाल्याचे दिसून येते. आंदोलनाच्या दिवशी पर्सेसिन नेट फिशिंग आणि एलईडी फिशिंग करणाºया बोटी समुद्रामध्ये मासेमारी करताना आढळल्यास त्या बोटी समुद्रामध्येच फोडून टाकण्यात येणार आहेत.

टॅग्स :Raigadरायगड