शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल कोटा निम्मा झाल्याने मच्छीमार संकटात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 06:19 IST

थकबाकी देण्यासाठी शासनाकडून दिरंगाईमासळीसाठी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना कधी कधी २०-२५ दिवसांची ट्रीप करावी लागते. त्यामुळे मच्छीमारांवर आता बाहेरून जादा दराने डिझेल खरेदी करण्याची पाळी येऊन ठेपली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : राज्यातील प्रत्येक मच्छीमारांना मासेमारी करण्यासाठी देण्यात येणारा डिझेल कोटा १५ दिवसांसाठीच सुमारे चार हजारांऐवजी फक्त १७५० लीटर देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून काढण्यात आले आहे. याआधीच मच्छीमारांना डिझेल परताव्याची सुमारे २३० कोटी असलेली थकबाकी देण्यात शासनाकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे राज्यातील लाखो मच्छीमार पुरता आर्थिक संकटात सापडला असतानाच नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कमी डिझेलमुळे मच्छीमारांना मासेमारी व्यवसाय करणे आणखी अवघड होऊन बसणार आहे.

मुंबई, उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांतून प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय केला जातो. या मच्छीमार व्यवसायावर सुमारे पंधरा लाख कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. या सात जिल्ह्यांतील १६० मच्छीमार संस्थांच्या ९६४६ मासेमारी करणाऱ्या यांत्रिक नौकांसाठी १ ते १५ जानेवारी २०२१ या दरम्यान १५ दिवसांसाठी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या प्रत्येक यांत्रिक बोटीसाठी १७५० लीटर्स डिझेल देण्याचे फर्मान मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी काढले आहेेत. याआधी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या यांत्रिक नौकेसाठी मच्छीमारांना सहा महिन्यांपर्यत पुरेल इतका डिझेल कोटा मंजूर करण्यात येत होता. त्यामुळे देण्यात येणारा १७५० लीटर्स डिझेल कोटा एका ट्रिपसाठी अपुराच आहे.

मासळीसाठी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना कधी कधी २०-२५ दिवसांची ट्रीप करावी लागते. त्यामुळे मच्छीमारांवर आता बाहेरून जादा दराने डिझेल खरेदी करण्याची पाळी येऊन ठेपली आहे. आयुक्तांच्या या आततायी निर्णयामुळे मात्र राज्यातील मच्छीमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मच्छीमारांना किमान सहा महिन्यांसाठी पुरेल इतका डिझेल कोटा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील लाखो मच्छीमार शासनाकडे थकीत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या डिझेल परताव्याच्या रकमेची प्रतीक्षा करीत असतानाच १५ दिवसांसाठी फक्त १७५० लीटर इतकाच डिझेल कोटा मंजूर करून मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी मच्छीमारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मच्छीमारांना किमान सहा महिन्यांसाठी पुरेल इतका डिझेल कोटा मंजूर करण्याची आवश्यकता आहे. - भालचंद्र कोळी, अध्यक्ष, करंजा मच्छीमार सहकारी संस्था

टॅग्स :fishermanमच्छीमार