शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

नानवेल दीपगृह बंद असल्याने मच्छीमारांचे हाल; धोका बळावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:17 IST

वातावरण खराब असताना रात्री दिशा समजत नसल्याने होड्या भरकटल्या

संजय करडे मुरुड : तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. येथे सूर्यदर्शन होत नसल्याने काळ्याकुट्ट ढगाने वातावरणात नेहमीच काळोख असतो. त्यातच खोल समुद्रात सुद्धा ढगाळ वातावरण असल्याने सर्वत्र काळोख दिसून येतो. अशा या वातावरणात खोल समुद्रात जाणाऱ्या बोटींना मुख्य आसरा हा समुद्रात असणाºया दीपगृहाचा असतो. मुरुड तालुक्यात कोर्लई तर दिघी गावाच्या नजीक मणेरी नानवेल हे दीपगृह आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून मणेरी नानवेल येथील दीपगृह नादुरुस्त असल्याने येथील लाइटचा प्रकाश रात्रीच्या समयी न पडल्याने मच्छीमारांच्या होड्यांचा धोका अधिक बळावला आहे. त्यातच काही बोटींना दिशा न दिसल्याने त्या भलत्याच ठिकाणी जाऊन भरकटल्या गेल्या आहेत.

रात्रीच्या समयी दीपगृहातील लाइट प्रखरतेने प्रज्वलित होऊन समुद्रातील होड्यांना दिशा दाखवण्याचे महत्त्वाचे काम करीत असते. या लाइटच्या प्रकाशावर मच्छीमारांना आपण कोणत्या दिशेला आहोत याचे आकलन होत असते. मात्र दिघी गावाच्या नजीक मणेरी नानवेल हे दीपगृह गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त असल्याने येथील लाइटचा प्रकाश रात्री न पडल्याने मच्छीमारांच्या होड्या भरकटल्या आहेत.संबंधितांनी लक्ष द्यावे-बैले

याबाबत रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले म्हणाले की, नानवेल दीपगृहाची लाइट प्रकाशित न झाल्याने आमच्या कोळी बांधवांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी खडक सुद्धा आहे, जर ही दीपगृहाची लाइट पेटली नाही तर आमच्या होड्या या खडकावर आदळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या समयी काळोख असल्याने मच्छीमारांना दिशा न सापडल्याने होड्या भरकटल्या जात आहेत. जर हा दीपगृह नादुरुस्त असेल तर आजूबाजूच्या सर्व मच्छीमार सोसायट्यांना याची आगाऊ कल्पना देणे आवश्यक आहे. तरी यासंदर्भात संबंधित खात्याने हे लाइट हाऊस तातडीने सुरु करण्याची मागणी बैले यांनी केली आहे.