शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस वेवरील पहिल्या लेनवरील वाहने सुसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:43 IST

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील पहिल्या लेनमधून प्रवास करताना ताशी ८० कि.मी. गतीपेक्षा कमी वेगाने वाहन

जयंत धुळप अलिबाग : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील पहिल्या लेनमधून प्रवास करताना ताशी ८० कि.मी. गतीपेक्षा कमी वेगाने वाहन चालविण्यास मनाई करणारी अधिसूचना राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आर. के. पद्मनाभन यांनी जारी केली आहे. त्यामुळे आता पहिल्या लेनमधून वाहने सुसाट धावणार आहेत.एक्स्प्रेसवेवरील अपघात व वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी द्रुतगती महामार्गावरील प्रत्येक वाहिनीत तीन लेन असतात. त्यापैकी कार, जीप, टेम्पो या हलक्या वाहनांनी द्रुतगती महामार्गाच्या मध्य लेनमधून, जड-अवजड वाहनांनी सर्व्हिस लेनला लागून असलेल्या सर्वात डाव्याकडील लेनमधून प्रवास करणे अपेक्षित असते. तसेच त्यांनी केवळ पुढील वाहनास ओव्हरटेक करताना उजवीकडील लेनचा अवलंब करून लेनमधील उजवीकडील लेन कायम रिकामी ठेवणे आवश्यक आहे.पहिली लेन ही ओव्हरटेककरिता आहे. तथापि, बरीच वाहने पहिल्या लेनमधून प्रवास करताना ताशी ८० कि. मी. गतीचा वापर न करता, त्यापेक्षा कमी गतीने वाहने चालवितात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या चालकांना वाहन चालविण्यास अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असते. द्रुतगती महामार्गावर अपघात आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच लेनच्या शिस्तीचे पालन करणे यासाठी मोटार वाहन कायद्यान्वये अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, उजवी लेन ही हलक्या वाहनांच्या ओव्हर टेकिंगसाठी राखीव असून, कमी गतीने वाहन चालविण्यास मनाई असल्याबाबत टोल तिकिटावर अटी व शर्ती म्हणून लेखी स्वरूपात नमूद करावी. तसेच याबाबत बोर्ड, चिन्हे, फलक व तत्सम सूचना योग्य ठिकाणी लावण्याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने करावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत. अधिसूचना पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहील, असे आवाहन पद्मनाभन यांनी केले आहे.