शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

रायगडमधील सहा तालुक्यांत अग्निसुरक्षा वाऱ्यावर, महाड औद्योगिक वसाहतीसोबत फक्त शहरालाच स्वतंत्र सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 10:47 IST

महाड तालुक्याचा विचार केला तर औद्योगिक वसाहतीकरिता स्वतःची अग्निशमन यंत्रणा आहे. तर महाड शहराकरिता महाड नगरपालिकेची स्वतःचे असे अग्निशमन दल आहे.

महाड :  आपत्कालीन स्थिती उद्भवल्यानंतर अनेकांना अग्निशमन दलाची आठवण होते. मात्र, शहर आणि औद्योगिक वसाहती वगळता संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी कोणतीही यंत्रणा शासनाकडे उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे ग्रामीण भागात एखादे अग्निकांड अगर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर शहरी भागातून येणाऱ्या या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. 

महाड तालुक्याचा विचार केला तर औद्योगिक वसाहतीकरिता स्वतःची अग्निशमन यंत्रणा आहे. तर महाड शहराकरिता महाड नगरपालिकेची स्वतःचे असे अग्निशमन दल आहे. तालुक्यातील ग्रामीण भागांत उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत याच दोन दलांवर अवंलबून राहावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे रायगड जिल्ह्यात तालुका पातळीवर ग्रामीण भागांत अग्निशमन दल सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही. संपूर्ण रायगड जिल्ह्यात हे केवळ १३ अग्निशमन दल कार्यरत आहेत. 

प्रत्येकाला स्वतःचे कार्यक्षेत्र ठरलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाडशेजारी असलेल्या पोलादपूर, गोरेगाव, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, इंदापूर आदी तालुक्यांच्या ठिकाणी कोणतेही अग्निशमन दल नसल्याने भविष्यात हे  चित्र अधिक धोकादायक ठरणार आहे. 

येथे खासगी अग्निशमन दलमहाड, रोहा, पेण, आलिबाग, खोपोली, कर्जत या प्रमुख नगर परिषदांकडे अग्निशमन गाड्या उपलब्ध आहेत. तर महाड औद्योगिक वसाहत, रोहा औद्योगिक वसाहत, रिलायन्स नागोठणे, औद्योगिक वसाहत पाताळगंगा या औद्योगिक वसाहती आणि सुप्रिम पेट्रोकेम, एच.पी.सी.एल., गेल इंडिया प्रा. लि. यांचे खासगी अग्निशमन दल आहे. 

छोट्या अग्निशमन यंत्रणांची तरतूद हवी पोलादपूरप्रमाणेच महाडजवळ असलेले लोणेरे, माणगाव, इंदापूर, तळा, म्हसळा, श्रीवर्धन ही मोठी आणि शहरांचा दर्जा असलेली गावेदेखील अग्निशमन यंत्रणेपासून दूरच आहेत. याठिकाणी कोणतीही आगीची दुर्घटना घडली तर महाडमधील अग्निशमन दल पाहोचेपर्यंत उशीर झालेला असतो. अनेक ग्र्रामपंचायती आणि शहरे ही मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. ग्रामपंचायत स्तरावर छोट्या अग्निशमन यंत्रणांची तरतूद करणे गरजेचे आहे.

सर्वस्व गमावणाऱ्यांसाठी दर न परवडणारे रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावे आणि वाड्या या दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या आहेत. यामुळे या यंत्रणा पोहोचण्यास वेळ लागतो. महाड औद्योगिक वसाहतीची स्वतंत्र यंत्रणा आहे. तालुक्यात कुठेही दुर्घटना घडली तर हे पथक तात्काळ पोहोचते. मात्र, औद्योगिक वसाहतीची ही अग्निशमन यंत्रणा आपले क्षेत्र सोडल्यानंतर आता त्यांचा शासनाने ठरवून दिलेला दर आकारण्यास प्रारंभ करत आहे. आगीत सर्वस्व गमावणाऱ्यांना हा दर परवडणारा नसतो.   

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दल