शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

अलिबागमधील जत्रौत्सवामुळे नागरीकांना अर्थिक आधार

By निखिल म्हात्रे | Updated: December 11, 2023 16:38 IST

अलिबाग तालुक्यातील वरसोली येथी विठोबा मंदीरातील यात्रेला तरुणाई सह मध्यमवर्गीयांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

निखिल म्हात्रे,अलिबाग: गावची जत्रा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते खेळणी, खाऊचे गाळे, सेल्फी स्टिक्स, गॉगल यांचे फिरते विक्रेते. अगदी कानातल्यापासून मोबाइल कव्हपर्यंत आदी सर्व वस्तू मिळण्याचे ठिकाण. तर दुसरीकडे मनोरंजनात्मक आकाश पाळणे, नागमोडी खेळ, तर मिकीमाऊस सारख्या विविध खेळण्यांनी वरसोली गावातील परीसर गजबजून गेला आहे.

लाखाच्या घरात पाच दिवसात उड्डाणे करणार्‍या अलिबाग तालुक्यातील वरसोली येथी विठोबा मंदीरातील यात्रेला तरुणाई सह मध्यमवर्गीयांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यात्रेच्या प्रवेशद्वारावरच पहिली भेट होते ती गॉगल विक्रेत्याशी. तिथून पुढे गळ्यात अडकवायचे रंगीबेरंगी रुमाल विक्रेता दिसतो. प्रवेशद्वाराच्याच ठिकाणी खेळणी, फुगे, पिपाण्या, कानातले विकणारे फिरते विक्रेते या सगळ्या गर्दीतून आपण बरोबर पत्त्यावरच आलो आहोत याची खातरजमा करून प्रवेशद्वारातून आत गेल्यावर सुरुवातीलाच खारे दाणे आणि लिमलेटच्या गोळ्यांची विक्री करणारा गाळा.

सेल्फी स्टिक्स विक्रेत्यांची तर या पाच दिवसाच्या यात्रेत दिवाळीच होती. बघावे तिथे सुरू असलेले फोटो सेशन. पोलिसांची नजर चुकवून यात्रेत प्रवेश केलेला आणि गर्दीत मिसळून आपले काम शांतपणे करणारा भिकारीही. दुसर्‍या बाजूला खाण्याच्या पदार्थाच्या गाळ्यांवर असलेली मोठी गर्दी. दोन मिनिटे एखाद्या ठिकाणी थांबल्यावर कोणता पदार्थ छान आहे. याच्या कानावर पडणार्‍या चर्चा. या सगळ्यातून ग्रंथदालनाचीही सुटका झाली नाही. ग्रंथदालनातही भिंग, औषधी तेल, शोभेच्या वस्तू, टूलकिट, संगणक साफ करण्याची उपकरणे अशा वस्तूंच्या गाळ्यांवर गर्दी दिसत होती.यात्रेत येणा-या तरुणाईने मनोरंजनासाठी आकाश पाळणे, नागमोडी खेळ, लहान मुलांसाठी मिकीमाऊसचे खेळ, टोराटोरा तसेच विविध मनोरंजनाचे खेळ या जत्रेत पहावयास मिळत होते. याबरोबरच या खेळाचा आनंद ही सर्वजण लहान होत लुटत असताना पहावयास मिळत होते.जत्रेत काय काय मिळत होते -

लिमलेटच्या गोळ्या, खारे दाणे, पाणीपुरी, कुल्फी, वडापाव असे खाद्यपदार्थ, पिपाण्या, गॉगल, रंगीबेरंगी रुमाल, सेल्फी स्टिक्स, कानातले, लहान मुलांची खेळणी, भिंग, औषधी तेल, शोभेच्या वस्तू, यंत्र दुरुस्तीची उपकरणे, संगणक स्वच्छ करण्याची उपकरणे आदी.लाकडी खळणी पडद्याआड - 

लहान मुलांना कुठल्याही खेळण्यांचे प्रंचड आकर्षण असते मग ती खेळणी लाकडी असतो की प्लास्टिकची. मध्यंतरी चीन मधून आलेली प्लास्टिकची काही खेळणी मुलांनी तोंडात घातल्याने काही बालकांना विषबाधा झाली असे ऐकले आहे. कारण प्लास्टिकची खेळणी बनविण्यासाठी जे रंग वापरले होते त्या रंगात जस्त, कथिल अशी विषारी खनिजे होती. लहान मुलांच्या सवयीप्रमाणे त्यांनी ती खेळणी हातास लागताच तोंडात घालण्यास सुरवात केली. त्यामुळे लाकडी खळणी मात्र आज पडद्याआड गेली.वर्षातील शेवटचे दोन महीने म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर हा महीना जत्रौत्सवाचा असल्याने आम्हा तरुणाईसाठी एक आनंद देणारी पर्वणीच असते. या जत्रौत्सवात मनोरंजनाचे विविध खेळ असल्याने एक नवा आनंद अनुभलायला मिळतो. त्यामुळे हा जत्रौत्सव शांततेत पार पडावा यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत असल्याचे अमेय घरत यांनी सांगितले.मागील २० वर्षांपासून अलिबाग येथील वरसोली जत्रेत माझे कपडे व पडद्याचे दुकान आहे. आज माॅलच्या दुनियेत ही गावाठिकाणी या जत्रांना महत्व आहे. जत्रेत फियायला येणारे कित्येक जण माझ्या स्टाॅलला भेट देऊन जातात. एवढेचस नव्हे तर माझ्या स्टा्ॅल मधून वस्तु ही खरेदी करतात, त्यामुळे माझा चांगला अर्थिक गणीत बसत. दिवसाला साधरणता 4 हजाराच्या वस्तु विकल्या जातात.- उस्मान कादरी, पडदा विक्रेता.मागील चाळीस वर्ष माझे उसाच्या रसाचे दुकाणात आहे. पाच दिवस दिसभर दुकाणात सरासाठी अनेकांची गर्दी असते. दिवसाला सहाशे ग्लास उसाचा रस विकला जातो.- जीतू वर्तक, रस विक्रेता.

टॅग्स :alibaugअलिबाग