वावोशी : जमिनीच्या वादातून सतत भांडण व मानसिक त्रास देणाऱ्या पुतण्या व वहिनीच्या त्रासाला कंटाळून विजय पवार (४२,रा.तुपगाव) यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा गुन्हा खालापूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्यामुळे आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.शुक्र वारी २१ एप्रिल रोजी विजय पवार (रा.तुपगाव) यांचा मृतदेह कर्जत पनवेल रेल्वे मार्गावर खालापूर हद्दीतील वरोसे गावानजीक रात्री पावणेनऊच्या सुमारास आढळून आला होता. माहिती मिळताच चौक दूरक्षेत्र पोलीस चौकीतून सपोनि खरे व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचले होते. प्राथमिक तपासात दारूच्या नशेत विजय पवार रेल्वे रूळावर येवून अपघात घडल्याची नोंद खालापूर पोलीस ठाण्यात केली होती.परंतु त्यानंतर विजय पवार यांचा मुलगा अक्षय याने जमिनीच्या वादातून सतत भांडण करणारी अनिता पवार व तिचा मुलगा अजय पवार हे वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्र ार दिली. अनिता पवार व अजय पवार यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून विजय पवार यांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची तक्र ार त्यांचा अक्षयने दिल्यानंतर गुन्हा दाखल केला.
खालापुरात आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
By admin | Updated: April 27, 2017 00:06 IST