शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सावरोली ग्रामपंचायतीत भ्रष्ट्राचार प्रकरणी गुन्हा दाखल , एक कोटीचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:14 IST

एक कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांनी बरखास्त केलेल्या सावरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच

वावोशी : एक कोटीच्या भ्रष्टाचार प्रकरणी कोकण विभागीय आयुक्तांनी बरखास्त केलेल्या सावरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचासह सात सदस्य, ग्रामसेवक गणेश किसन शिंदेवर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खालापूर तालुक्यात शिवसेनेची सत्ता असलेल्या सावरोली ग्रामपंचायतीत २०१५ ते २०१६ या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी व इतर कामामध्ये सुमारे ९९ लाख ५९ हजारांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सावरोलीचे ग्रामस्थ अ‍ॅडव्होकेट संतोष बैलमारे यांनी १९ जानेवारी २०१७ साली खालापूरच्या पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याकडे केली होती. त्यानुसार चौकशी होऊन अहवाल रायगड उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे व पुढे नवी मुबईच्या कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. २ जानेवारी २०१८ला कोकण विभागीय आयुक्त यांचेकडे अंतिम सुनावणी होऊन मुंबई ग्रामपंचायत अधिनियम (१९६९ मुंबई अधिनियम क्रमांक ३ कलम ३९(११)अन्वये सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह ग्रामसेवक गणेश किसन शिंदे यांना दोषी धरून ग्रामपंचायत बरखास्तीचा आदेश आयुक्तांनी दिला होता; परंतु या आदेशावर स्थगिती मिळवत बाजी मारली. या भ्रमात असणाºयांना मंगळवारी चांगलाच दणका बसला.भ्रष्टाचार प्रकरणी पंचायत समिती विस्तार अधिकारी मीनल जनार्दन कनोजे यांनी खालापूर पोलीसठाण्यात तक्रार दिल्यानंतर सरपंच सरिता मुकणे, जयश्री पाटील, प्रवीण गोविंद बैलमारे, संतोष नारायण घोसाळकर, तेजल बारड, वृषाली पाडगे, नरेंद्र लक्ष्मण तटकरे, ज्योती उद्देश पवार व उषा घोसाळकर, ग्रामसेवक गणेश किसन शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होत असल्याची माहिती मिळताच काही सदस्य अज्ञातवासात गेले असून, पाच सदस्य पोलीस ठाण्यात हजर होते.