शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

फौजी आंबवडेत आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:06 IST

फौजी आंबवडे गावात आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे मिळावी या हेतूने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महाड व परिसरातील डॉक्टर आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या

अलिबाग : फौजी आंबवडे गावात आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे मिळावी या हेतूने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महाड व परिसरातील डॉक्टर आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनीच गावातील सैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांच्याकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.‘फौजी आंबवडे विकासापासून वंचित’या वृत्तातून ‘लोकमत’ने शासकीय निष्क्रियता सर्वांसमोर आणल्यावर जिल्ह्यातील अनेकांनी फौजी आंबवडे गावातील सैनिक आणि माजी सैनिकांच्या कुटुंबीयांकरिता सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून काही तरी करायचा प्रस्ताव ‘लोकमत’शी बोलताना सांगितला होता.महाडमधील डॉ.चेतन सुर्वे, डॉ.सुनील शेठ आणि डॉ.चंद्रशेखर दाभाडकर हे या आरोग्य शिबिराचे नियोजन करीत आहेत. प्रजासत्ताक दिनी पूर्व नियोजित कार्यक्रम असतात, परंतु यंदा आम्ही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या आरोग्य शिबिराकरिता वेळ देवून आरोग्य तपासणी व उपचार करणार असल्याचे डॉ.चेतन सुर्वे यांनी सांगितले. तर प्रजासत्ताक दिनी सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांची आरोग्य तपासणी आम्ही करू शकणार असल्याने यंदाचा प्रजासत्ताक दिनी संस्मरणीय होईल, अशी भावना डॉ.सुनील शेठ यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते मोहन शेठ यांनी देखील संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. या आरोग्य शिबिरात विविध शाखांचे एकूण १५ डॉक्टर्स सहभागी होतील असा विश्वास डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांनी व्यक्त केला आहे.फौजी आंबवडे गावात आरोग्य सुविधा चांगली असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केला आहे. मात्र फौजी आंबवडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कायमच बंदावस्थेत असते, कधीतरी पंधरा दिवसातून एकदा एखादी परिचारिका येऊन जाते. हे उपकेंद्र बंद असल्याने गावातील रुग्णांना विन्हेरे आरोग्य केंद्र अथवा महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. मात्र या उपकेंद्रात आरोग्य अधिकारी कधीच फिरकत नाहीत. आरोग्य विभागाचा दावा योग्य नसल्याचे फौजी आंबवडे येथील ग्रामस्थ सचिन पवार यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.