शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा पाण्यासाठी लढा

By admin | Updated: June 16, 2016 00:42 IST

रायगड जिल्ह्यात पाणी कमी नाही मात्र आज आदिवासींसह सर्वांनाच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. नैसर्गिक संकटे परवडली मात्र कर्जत तालुक्याच्या सांगवी आदिवासी वाडीला गेली काही वर्षे

- अमोल पाटील,  खालापूर

रायगड जिल्ह्यात पाणी कमी नाही मात्र आज आदिवासींसह सर्वांनाच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. नैसर्गिक संकटे परवडली मात्र कर्जत तालुक्याच्या सांगवी आदिवासी वाडीला गेली काही वर्षे कृत्रिम पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. कारणही तसेच आहे. पूर्वी मुबलक पाणी मिळायचे मात्र गावात पाण्याची कंपनी आली अन् टंचाईला सुरु वात झाली. त्यातच पाणी मिळण्यासाठी गावकरी आपला संताप प्रशासनावर व्यक्त करीत आहेत.रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका पाणीटंचाईने चांगलाच होरपळत आहे. उल्हास, पेज या नद्या गावांच्या जवळून वाहत आहेत मात्र नद्यांचे पात्र कोरडे पडल्याचे भयाण वास्तव आहे. तालुक्याचा टंचाई कृती आराखडा मंजूर झाला. पाणी देण्याचे काम महसूल प्रशासन करीत देखील आहे मात्र कर्जत तालुक्यातील टंचाई कृती आराखड्यात असलेले सांगवी गाव,सांगवी आदिवासी वाडीत पाण्याचे भीषण दुर्भिक्ष जाणवत आहे. अलीकडे तीन वर्षांपूर्वी गावात पाणीटंचाई नव्हती असे गावकऱ्यांचे म्हणणे, मात्र गावातड्रिंकिंग वॉटर कंपनी उभी राहिली आणि गावाच्या बोअरवेलला असणारे पाणी गेले असल्याचा आरोप आदिवासी महिलांनी केला आहे.गावाच्या बोअरवेल या २०० फूट होत्या मात्र कंपनीने ज्या बोअरवेल मारल्यात त्या ४०० फुटांच्या वरती असल्याने आदिवासी वाडीतील बोअरवेलचे पाणी गेले आहे आणि आज एकाही नवीन बोअरवेलला पाणी लागत नाही असेही गावकरी सांगत आहेत. सांगवी गावाजवळ ड्रिंकिंग वॉटर कंपनी असून पाण्याची विक्र ी होते मात्र आम्हाला पाण्याच्या एका थेंबासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे गावकरी मोतीराम घारे यांनी सांगितले. रायगड जिल्हा परिषदेने नवीन दोन ठिकाणी नव्याने बोअरवेल मारल्या आहेत. त्याही कोरड्या निघाल्या असून या टंचाईला सर्वस्वी कंपनी जबाबदार असून तर निवासी जमीन असल्याने व्यावसायिक वापर झाल्याने बिनशेतीचे उल्लंघन होत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य पूजा थोरवे यांनी सांगितले.कार्यवाहीचे आश्वासनबोअरवेल अधिग्रहणासाठी तहसील विभागाने सांगवी ग्रामपंचायतीला पत्र देऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र कर्जत पोलीस आता बंदोबस्त देण्याकामी टाळाटाळ करीत आहेत. यामुळे आदिवासींची पाणीटंचाई दूर होण्यास पोलिसांची आडकाठी येत असल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्रामस्थांन नाराज आहेत. याबाबत नव्याने पत्र तयार करून ग्रामसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे, मी नव्याने आल्याने हे प्रकरण काय आहे, याबाबत माहिती घेऊन पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यवाही करण्यात येईल, असे कर्जत पोलीस ठाण्यात नव्याने रु जू झालेले पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी सांगितले.या कंपनीवर कारवाई करणार आहे. कंपनी स्वत:च्या फायद्यासाठी पाण्याचा उपसा करीत असलेल्या बोअरवेल आदिवासी वाडी आणि सांगवी गावासाठी अधिग्रहण करीत असल्याचे पत्र कंपनीला देणार आहोत. जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याने बिनशेतीचे उल्लंघन केल्याने बिनशेती परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येऊन कंपनीवर कारवाई करणार आहे.- रवींद्र बाविस्कर, तहसीलदार