शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पावणेसात हजार हेक्टर शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 23:54 IST

रायगडमधील फळबागांचे मोठे नुकसान : ११ हजार ४३१ घरांची पडझड; पंचनामे करण्याचे काम सुरू

निखिल म्हात्रे।लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सहा हजार ७६६.२२ हेक्टर शेती व फळबाग लागवड क्षेत्राचे नुकसान झाले. अंदाजे ११ हजार ४३१ घरांची पडझड झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली आहे. तर गोठे व इतर पडझड झाल्याची माहिती घेत त्यांचे पंचनामे करण्याचे काम शासनामार्फत सुरू आहे.

निसर्ग वादळाचे पर्व संपल्यानंतर जिल्ह्यात गुरुवारपर्यंत सतत पाऊस पडत होता. त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते साफ करताना अनेक संकटांचा सामना करावा लागला. जिल्हा प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासनही रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करीत नागरिकांना येण्या-जाण्यासाठी रस्ता मोकळा कररून देत होते. आपत्ती व्यवस्थापन व पोलीस विभागामार्फत आपत्ती आलेल्या ठिकाणी, योग्यरीत्या कामकाज केल्याने जीवितहानी टळली; मात्र या आपत्तीत घरे व गोठे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निसर्ग वादळात अलिबागमधील एक, माणगावमध्ये दोन तर श्रीवर्धनमध्ये एक अशा एकूण चौघा जणांना आपला जीव गमवावा लागला. तर ३९ गुरे या वादळामुळे मृत्युमुखी पडली. जिल्ह्यातील टेलिफोन सेवा पूर्णत: खंडित झाली असून ती पूर्ववत करण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तळा तालुक्यातील १०३ शाळा, ९३ अंगणवाड्या, १४ ग्रामपंचायत कार्यालये, एक प्राथमिक आरोग्य केंद्र तर एका डॉक्टर निवासाचे नुकसान झाले आहे.

खालापूर तालुक्यात शाळा, २ शासकीय कार्यालये; माणगाव २ शाळा, २ शासकीय कार्यालये; महाड ४ शाळा, १ शासकीय गोदाम; श्रीवर्धन ३४० शासकीय कार्यालये; म्हसळा येथे २५० शाळा, १० मंदिरे तसेच १६ शासकीय कार्यालयांचे नुकसान झाले आहे. तर रायगड जिल्ह्यात १४ हजार ७०५ विद्युत खांब व तारा तुटल्या आहेत. सध्या विद्युत खांब व तारा जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहे.एक लाख ९८ हजार ३५४ झाडे जमीनदोस्तरायगड जिल्ह्यात अंदाजे एक लाख ९८ हजार ३५४ झाडे जमीनदोस्त झाली आहेत. झाडे पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने जिल्ह्यात मोठी वित्तहानी झाली आहे. रस्त्यावर झाडे पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. मात्र जिल्हा प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने रस्त्यात पडलेली झाडे बाजूला करून गावांची कनेक्टिव्हिटी होण्यास मदत झाली आहे. तर ११ हजार ४३१ घरांची पडझड झाली असून ती दुरुस्त करण्याचे काम सध्या जिल्हाभरात जोरदार सुरू आहे. एकूण ३६४ शाळा, ३६० शासकीय कार्यालये, ९३ अंगणवाड्या, १० मंदिरे, १ शासकीय गोदाम, १४ ग्रामपंच्यात कार्यालये, एक प्राथमिक आरोग्य केंद्र तर एक डॉक्टर निवास यांचे नुकसान झाले आहे.थळ परिसराची मुख्यमंत्र्यांनी के ली पाहणीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी रायगड दौऱ्यावर आले होते. निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा दौरा होता. अलिबाग तालुक्यातील थळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या परिसराची पाहणी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी दुपारी १२ च्या सुमारास केली. अलिबाग थळ येथे झाडे, विजेचे पोल पडून अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री येणार म्हणून थळ परिसरात पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.नागोठणेत ५० लाखांचे नुकसान; पंचनाम्यासाठी ग्रामपंचायतीची मदतनागोठणे : बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने नागोठणे शहरात ५० लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी रोह्याचे प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी शहराच्या विविध भागांत फिरून नुकसानीची पाहणी केली असून नुकसानीचे पंचनामे करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पंचनामे तलाठ्यांना एकाचवेळी करणे शक्य नसल्याने नुकसानीची प्राथमिक माहिती घेण्यासाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारी कार्यरत करण्यात आले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ