शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

फौजी आंबवडे गाव सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:54 IST

सैनिक संघटनेचे निवेदन : जिल्हाधिकारी देणार कार्यवाहीचे आदेश

अलिबाग : भारत देशाच्या सेवेसाठी मोठ्या संख्येने जवान देणाऱ्या महाड तालुक्यातील फौजी आंबवडे गावामध्ये सुविधांची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. सरकार आणि प्रशासनाने तातडीने गावातील विकासाकडे लक्ष द्यावे, अशा मागणीचे निवेदन आजी-माजी सैनिक संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकाºयांना दिले. समस्या सोडवण्याबाबत संबंधित अधिकाºयांना आदेश देऊन पुढील सात दिवसांत काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवाल देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

फौजी आंबवडे या गावाला सुमारे २५० वर्षांपासून सैनिक कुटुंबांची परंपरा लाभलेली आहे. ब्रिटिश काळापासून या गावातील नागरिक सैनिकी सेवेत आहेत. पहिल्या महायुद्धामध्ये याच गावातील १११ जवानांनी सहभाग घेतला होता. त्यातील सहा जवानांना वीरमरण आले होते. त्यांच्या स्मरणार्थ ब्रिटिश राजवटीत गावात स्मारक उभारण्यात आले होते. दुसरे महायुद्ध, १९६२ मध्ये भारत-चीन युद्धामध्ये तब्बल ३५० सैनिकांचा सहभाग होता. १९६५ च्या युद्धामध्येही गावातील सैनिकांनी दुष्मन सैन्याशी दोन हात केले होते. त्यामध्ये सुभेदार रघुनाथ कदम हे शहीद झाले होते. त्यानंतर १९७१ च्या भारत-पाक युद्धात ४०० सैनिकांनी सहभाग घेत अतुलनीय पराक्रम केला होता. नायक मनोहर पवार यांना सेवा मेडल प्रदान करण्यात आले होते.तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर अंतुले यांच्या शिफारशीने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या गावाल भेट देऊन फौजी आंबवडे हे नाव दिले होते. गावातील सैनिकांनी देशाची सेवा केली आहे आणि आजही करत आहेत; परंतु हेच गाव विकासापासून वंचित राहिले आहे. गावामध्ये पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा असून नसल्या सारख्याच आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ पवार, उपाध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस, बाळाराम पवार, प्रभाकर जाधव, गंगाराम पवार आदी उपस्थित होते.या सुविधांची गावाला आहे गरजच्महाड-फौजी आंबवडे रस्ता अपूर्ण आहे. रस्त्याचे डांबरीकरण सुमारे दहा वर्षांपूर्वी झाले आहे, त्यामुळे रस्त्याची बिकट अवस्था असल्याने रस्त्याचे तातडीने काम होणे गरजेचे आहे.च्पोलादपूर तालुक्याला जोडणार रस्ता २० वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. त्याचेही काम अर्धवट आहे. या रस्त्याचे काम झाल्यास फौजी आंबवडे, शिरवली, पांगारी, विन्हेरे, रावतळी, फाळकेवाडी, ताम्हाणे, कावळे कुंभर्डे, गवाडी ही गावे पोलादपूर तालुक्याच्या संपर्कात येणार आहेत. त्याचप्रमाणे गावात एकूण २३ वाड्या आहेत त्यांना जोडण्यासाठी अंतर्गत रस्ते आणि साकव (पूल) बांधणे गरजेचे आहे.1गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खिंडवाडी ते अहिरेवाडी, मधला कोंड ते चिंचेची वाडी आणि सावळेवाडी अशा तीन योजना आहेत. पाइपलाइन खराब झाली आहे, तसेच धरणातून थेट पाणी येत असल्याने ते पिण्यालायक नसते, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे.2गावातील शहीद स्मारकांचे गेल्या दोन वर्षांपूर्वी सुशोभीकरण रायगड जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले होते. त्याचे कामही अर्धवट स्थितीच आहे. त्याचप्रमाणे झालेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याने दयनीय अवस्था झाली आहे. त्याचे काम तातडीने पूर्ण करावे.आरोग्य सुविधा नाहीच्गावामध्ये उपआरोग्य केंद्र आहे; परंतु सातत्याने मागणी करूनही डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने वयोवृद्ध माजी सैनिक, सैनिकांच्या पत्नी, लहान मुले यांना उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा प्राप्त होत नाहीत. गरोदर स्त्रियांना त्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Raigadरायगड