शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चिरनेरमध्ये परप्रांतीयांचा स्थानिक तरुणांवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 17:13 IST

चिरनेर गावातील स्थानिक तरुणांवर  परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

मधुकर ठाकूर

उरण : चिरनेर गावातील स्थानिक तरुणांवर  परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेसंदर्भात उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चिरनेर येथील सुभाष ठाकूर हे कुटुंब आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गेली अनेक वर्षे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात .त्यांच्या या व्यवसायाला त्याची पत्नी सविता ठाकूर, सुजित व रिक्षाचालक सुशांत ठाकूर ही दोन मुले सहकार्य करत आहेत.स्थानिकांच्या भाजीपाल्याच्या व्यवसायाच्या बाजूला परप्रांतीयही भाजीचा व्यवसाय करत आहेत.

सुशांत हा नेहमी प्रमाणे आपल्या आई वडिलांना मदत म्हणून भाजीचे  दुकान बंद करण्यासाठी गेला असता मेहताब अली अबुल कलाम अली उर्फ संजय हा परप्रांतीय भाजी विक्रेता इसम सुशांतच्या अंगावर थुंकला. या घटनेचा जाब सुशांतने सदर परप्रांतीय भाजी विक्रेता इसमाला विचारला असता दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.मेहताब अली अबुल कलाम अली उर्फ संजय यांनी सदर घटनेची खबर आपल्या सहकाऱ्यांना दिली.त्याच दरम्यान सुशांत हा स्थानिक तरुण आपला दुकान बंद करण्याच्या नादात बेसावध असताना मेहताब अली अबुल कलाम अली उर्फ संजय व त्यांचे सहकारी यांनी अवजड भाजी ठेवण्याचा ट्रे सुशांतच्या डोक्यात जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घातला व त्याला लाथाबुक्क्यांनी मारझोड केली.

आपल्या भावाला परप्रांतीय इसम मारत असल्याची बाब सुजित यांच्या निदर्शनास येताच तो भावाला सोडविण्यासाठी पुढे सरसावला असता मेहताब अली अबुल कलाम अली उर्फ संजय व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुजित ठाकूर यांच्या डोक्यात भाजी ठेवण्याचा ट्रे घालण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सुशांत व सुजित यांच्या डोक्याला,हाताला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. सदर घटनेची माहिती चिरनेर गावातील ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत  परप्रांतीय भाजी विक्रेत्यांनी त्या ठिकाणावरुन पोबारा केला होता.या घटने संदर्भात उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण