शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

सावलीचा पाणीप्रश्न गंभीर, माजी सरपंच मंदा ठाकूर यांचे तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:51 IST

सावली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंदा ठाकूर यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविरोधात आणि त्यामागील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून

आगरदांडा - सावली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मंदा ठाकूर यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येविरोधात आणि त्यामागील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी मुरुड तहसीलदार कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून आमरण उपोषण आंदोलन सुरु केले असून, मिठागर महिला व ग्रामस्थांनी उपोषणात सहभागी होवून त्यांना पाठिंबा दिला आहे.या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, नगरसेवक अविनाश दांडेकर, अनंता ठाकूर, पंचायत समिती सदस्य आशिका ठाकूर, भाजपा जिल्हा युवा अध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते, नितीन पवार, मानवअधिकारी संघटनेचे अध्यक्ष जाहीद फकजी, प्रवीण बैकर, उदय सबनीस, संजय भायदे, वृषाली कचरेकर, नेहा पाके आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.माजी सरपंच मंदा ठाकूर यावेळी बोलताना म्हणाल्या, गेले १0 वर्षे मिठागर खामदे गावाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. सन २00९-२0१0मध्ये ग्रुप ग्रामपंचायत सावलीमध्ये भारत निर्माणअंतर्गत मिठागर,सावली व खामदे येथे नळ पाणीपुरवठा योजना व २0११-१२मध्ये मिठागर येथे राष्ट्रीय पेय जल योजना राबविण्यात आली. पहिल्या योजनेसाठी ७५ लाख व दुसऱ्या योजनेसाठी ५0 लाख निधी मंजूर करून एकूण १ कोटी २५ लाख या योजनांवर खर्च झाले आहेत.परंतु या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाइप वापरण्यात आले. त्यामुळे अद्यापपर्यंत नऊ वर्ष पूर्ण होवून सुध्दा गावामध्ये पाण्याचा एक थेंब ग्रामस्थांना पिण्याकरिता मिळालेला नाही.तथापि या प्रकरणात भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत मुरु ड तहसीलदार कार्यालयाजवळ १८एप्रील २0१७रोजी उपोषण केले होते. त्या उपोषणात शासनमार्फत तीन लेखी आश्वासने दिली होती. त्यास एक वर्ष होऊन सुध्दा शासन दरबारी अद्यापपर्यंत कोणतीही पूर्तता अथवा त्याबाबत कोणतीही चौकशी करण्यात आलेली नसल्याचे ठौकूर यांनी सांगीतले.याबाबत शासनाला १४मार्च २0१८रोजी स्मरणपत्र देखील दिले होते, परंतु शासनाकडून कार्यवाही नाही. शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरु च राहणार असे मंदा ठाकूर अखेरीस म्हणाल्या.भाजपा जिल्हा युवा अध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते म्हणाले की, येत्या ९ तारखेला पालकमंत्री रवींद्र चव्हाण मुरु डमध्ये येणार आहेत. ग्रुप ग्रामपंचायत सावलीमध्ये भारत निर्माणअंतर्गत मिठागर,सावली व खामदे येथे नळ पाणीपुरवठा योजना व २0११-१२ मध्ये मिठागर येथे आणखी राष्ट्रीय पेय जल योजना राबविण्यात आली. पहिल्या योजनेसाठी ७५ लाख व दुसºया योजनेसाठी ५0 लाख निधी मंजूर करु न एकूण १ कोटी २५लाख या योजनांवर खर्च झालेले आहेत.त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्याची सखोल चौकशी करून ठेकेदार व अधिकाºयांवर कार्यवाही करणार असल्याचे अ‍ॅड. मोहितेने उपोषणकर्त्यांना आश्वासीत केले. शासनाचा अधिकारी दुपारपर्यंत फिरकला नाही.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या