शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

महाडमधील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत;अवकाळी पावसाचाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:03 IST

कोकणात यंदा चांगला पाऊस पडला, मात्र पाऊस लांबल्याने काही ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानेही भातशेतीचे नुकसान झाले.

दासगाव : कोकणात यंदा चांगला पाऊस पडला, मात्र पाऊस लांबल्याने काही ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसानेही भातशेतीचे नुकसान झाले. मात्र दोन्ही वेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा हा नाममात्र असल्याने सांगून कार्यालयात बसूनच पंचनामे करण्यात आल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यातही ज्या शेतकºयांनी विमा काढला आहे, त्या शेतकºयांच्या नुकसानीबाबत विमा कंपनीला माहितीच नसल्याचे समोर आले आहे.महाड तालुक्यात पावसाळ्यात आलेल्या पुराच्या पाण्याने सखल भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. महाड शहराजवळ असलेल्या सावित्री नदी किनारील गावांपैकी करंजखोल, चांभारखिंड, दासगाव, तर गांधारी किनारील मोहोप्रे, नाते, लाडवली, कोल, कोथेरी, वाळण, बिरवाडी आदी गावात नुकसान होते. पुराचे पाणी शेतात साचून राहिल्याने पीक कुजले. यावेळी झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्हावेत म्हणून शेतकरी मागणी करत होते, मात्र ठरावीक गावातच पंचनामे झाले.जुलै ते आॅगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीमध्ये केवळ १८१ शेतकºयांचे नुकसान पंचनामे करण्यात आले आहेत. या पूरपरिस्थितीमुळे ५१.८४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे अधिकारी सांगत आहेत. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरीत्या हे पंचनामे केले असले तरी अद्याप नुकसानीची भरपाई शासनाकडून शेतकºयांना प्राप्त झालेली नाही.हीच अवस्था नोव्हेंबर महिन्यात झाली आहे. अवकाळी पावसाने महाड तालुक्यात भात पिकाचे नुकसान झाले. भात कापणीच्या वेळी पाऊस आल्याने ज्या शेतकºयांनी भात कापले होते, त्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचा पेंढा देखील भिजून गेला. यावेळी देखील कृषी आणि महसूल विभागाने दुर्लक्ष केले. केवळ ३३ शेतकºयांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या कागदावर नोंद करण्यात आली आहे. याबाबत विमा कंपनी देखील स्वतंत्रपणे पंचनामा करणार असल्याचे सांगितले असले तरी ज्या कंपनीचे प्रतिनिधी या विभागात कार्यरत आहेत त्यांना याबाबत माहितीच नाही.पुरातील नुकसानीचे पंचनामे करून पाठवण्यात आले आहेत तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे देखील पंचनामे झाले आहेत. मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही- विजय पांढरे,तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरी