दांडगुरी : विविध शासकीय कामांसाठी लागणारे सातबारा तलाठी सजामधून मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना गेले वर्षभर हेलपाटे मारावे लागत आहेत. बहुतांश वेळा तलाठी सजातील सर्व्हर बंद असतो. सर्व्हर दुुरस्तीसाठीही वरिष्ठांच्या आदेशाची गरज असल्याने कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याने श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. एक सातबारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना दोन- दोन महिने वाट बघावी लागत आहे. अनेकदा तलाठी जागेवर नसल्याने त्यांच्या शोधासाठी तहसील कार्यालय गाठावे लागते. अवघ्या दहा रु पयांच्या सातबारासाठी तालुक्याच्या ठिकाणी दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे. गावामध्ये लागवडीसाठी, घरबांधण्यासाठी, इमारतीच्या बक्षीसपत्रासाठी जमिनीचे सातबारा कायम लागतात. मात्र, ते वेळात मिळत नसल्याने शासकीय योजनांपासून शेतकरी आणि नागरिकांना वंचित राहण्याची वेळ आली आहे.संपूर्ण रायगड जिल्ह्यात ही स्थिती असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
सातबारासाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे
By admin | Updated: April 30, 2017 03:41 IST