शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याबाबत शेतकरी उदासीन; सरकारकडून मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:22 IST

योजना चांगली मात्र अल्प प्रतिसाद; यंदा ६ हजार ७८० शेतकऱ्यांनी उतरवला विमा

महाड : बदलते हवामान आणि नैसर्गिक आपत्ती व कीड रोग यापासून नुकसान झालेल्या शेतकºयांना पीक विम्याचे संरक्षण मिळावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेला रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.असे असले तरी जिल्ह्यातील भातपीक शेतकºयांची संख्या पाहता पीकविमा उतरवणारे शेतकरी कमी असल्याने शेतकरी पीकविम्याला फारसे प्राधान्य देत नसल्याचे चित्र दिसत आहे.शेतकरी काबाडकष्ट करून भात, कडधान्य व इतर पिके घेत असतात. परंतु बदलणारे हवामान, अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती, पिकांवर पडणारे कीडरोग यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी शेतकºयाला पीक नुकसानीची रक्कम मिळावी या उद्देशाने २०१६-१७ या खरीप हंगामापासून पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जाते.कोकणामध्ये या हंगामात भात, नाचणी या पिकांसाठी विमा संरक्षण मिळते. यावर्षी पीक विमा उतरवण्यासाठी शेतकºयांना मुदतवाढही देण्यात आली होती.जिल्ह्यात यावर्षी ६ हजार ७८० शेतकºयांनी पीक विमा उतरवला आहे. मागील वर्षी २ हजार ७६३ शेतकºयांनी पीक विमा उतरवलेला होता. गतवर्षी भातासाठी ७८० रुपये हेक्टरी विमा हप्त्याची रक्कम शेतकºयांना भरावी लागली होती. यावर्षी केवळ २१० रुपये हेक्टरी विमा हप्त्याची रक्कम झाल्याने जास्त शेतकºयांनी लाभ घेतला आहे. शिवाय भातासाठी ३ हजार रुपये हेक्टरी विमा संरक्षण वाढवून ४१ हजार करण्यात आले.पीक विमा काढणारे शेतकरी मागील वर्षीच्या तुलनेत जरी वाढले असले तरी जिल्ह्यातील एकूण शेतकºयांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. या पीक विमा योजनेकडे शेतकरी फारसे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. रायगड जिल्ह्यात ३ लाख ११ हजार खातेदार शेतकरी असून प्रत्यक्षात शेती करणारे दीड लाख शेतकरी आहेत. यापैकी केवळ ६ हजार ७८० शेतकºयांनी पीक विमा उतरवलेला आहे.जिल्ह्यातील शेतकºयांची संख्या विचारात घेता पीक विम्याला मिळालेला प्रतिसाद खूपच कमी असल्याचे दिसत आहे. रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य तालुक्यात पर्जन्यवृष्टी, पूर व दरडीसारख्या आपत्तीही येत असतात. शिवाय खारे पाणी घुसून भातशेती तसेच कडधान्य शेतीचे नुकसान होत असल्याचे प्रकारही वारंवार घडतात. या सर्वांचा विचार करता पीक विमा उतरवण्यासाठी ज्याप्रमाणात शेतकºयांचा सहभाग हवा होता त्या प्रमाणात तो दिसत नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड