शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:39 IST

गॅस कंपनीविरोधात संताप; निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

वडखळ : रिलायन्स गॅस पाइपलाइनसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात तफावत केल्याप्रकरणी पेण प्रांत कार्यालयासमोर शेतकºयांनी सुरू केलेले साखळी उपोषण चौदाव्या दिवशीही सुरूच आहे. मंगळवारपासून विष्णू पाटील हे बेमुदत उपोषणास बसणार आहेत.रिलायन्स कंपनीच्या नागोठणे ते गुजरातमधील दहेजपर्यंत इथेन गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी शेतकºयांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील ५२९ शेतकरी लाभार्थी आहेत. सदर जमीन संपादित करताना काही शेतकºयांना ८० हजार तर काही शेतकºयांना २ लाख, तर काहींना ३ ते ७ लाखापर्यंत भाव देण्यात दिला असून कंपनीने मोबदल्यात तफावत केली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत, याबाबतचे पुरावे शेतकºयांचे नेते विष्णू पाटील यांनी जिल्हाधिकाºयांसमोर सादर केले. मोबदला देण्यात तफावत का? असा सवाल उपस्थित करीत येत्या गुरुवारपर्यंत शेतकºयांच्या मोबदला वाटपाचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. परंतु तीन दिवस झाले तरी रिलायन्स कंपनीने याबाबतची माहिती अद्यापही दिलेली नाही.जिल्हा प्रशासन व महसूल खात्याकडूनही कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे प्रांत कार्यालयासमोर शेतकºयांनी सुरू केलेले साखळी उपोषण चौदाव्या दिवशीही सुरूच आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेश देऊनही रिलायन्स कंपनीची मुजोरी सुरूच आहे. त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असून ३0 आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे विष्णू पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड