शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वरंध भोर घाटातील पडझडीमुळे पर्यटनाला खीळ; स्थानिकांचा रोजगार बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:35 IST

पावसामुळे संरक्षक भिंत कोसळून घाट बंद ; प्रवाशांची गैरसोय

बिरवाडी : महाड-पंढरपूर राज्य मार्गावरील वरंध भोर घाटामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे संरक्षक भिंत कोसळून हा घाट प्रवासाकरिता धोकादायक बनला आहे. याचा परिणाम पर्यटनावरही होत असून त्यासोबतच स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार बुडाल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

पश्चिम महाराष्ट्र व कोकणला जोडणाºया वरंध भोर घाटामुळे व्यापाराला चालना मिळण्यासोबतच पावसाळ्याच्या दिवसांत डोंगरावरून वाहणारे धबधबे व निसर्गाचा आनंद लुटण्याकरिता पर्यटक मोठ्या प्रमाणात या घाटाला पसंती देत असतात. मात्र, गेली दोन वर्षे मोबाइल टॉवरच्या केबलमुळे रायगड व पुणे जिल्ह्याला जोडणाºया या घाटामध्ये संरक्षक भिंत पडणे, दरड कोसळणे अशा घटना घडत असल्याने हा रस्ता वाहतुकीकरिता धोकादायक बनल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे गणेशोत्सवाकरिता कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये दाखल होणाºया चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तर दुसरीकडे वरंध भोर घाटातील पुणे व रायगड जिल्ह्याच्या हद्दीलगत असणाºया वाघजाई मंदिराजवळ वडापाव, भजी विकून आपला उदरनिर्वाह करणारे राम पवार हे १९८६ पासून वरंध भोर घाटामध्ये आपला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.मात्र गेल्या दोन वर्षांपासून मोबाइल टॉवरच्या केबलमुळे या घाट रस्त्याची पडझड होऊन पर्यटनाच्या हंगामामध्ये घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात येत असल्याने स्थानिक व्यावसायिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे राम पवार यांनी सांगितले. पर्यटनाला चालना देण्याकरिता महाड पंढरपूर राज्य मार्गावरील वरंध भोर घाटातील पडझड थांबविण्याकरिता राज्य शासनाने विशेष पावले उचलावीत, अशी मागणी महाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश देशमुख यांनी केली आहे.महाड-पंढरपूर राज्य मार्गावरील वरंध भोर घाटामध्ये असणाºया सह्याद्रीच्या पर्वतरांगांना गिर्यारोहक, इतिहासप्रेमी नेहमीच पसंती देत असतात. पावसात येथील निसर्गरम्य देखावा कॅमेऱ्यांमध्ये टिपण्याकरिता तरुण पर्यटक या घाटाला नेहमीच पसंती देतात. मात्र सद्य:स्थितीत हा घाट वाहतुकीकरिता धोकादायक झाला असल्याने पर्यटनाला खीळ बसत आहे.

टॅग्स :tourismपर्यटन