शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त एमआयडीसीत सांडपाणी वाहिनी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:19 IST

महाड औद्योगिक वसाहतीमधील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी तीन ठिकाणी फुटल्याचे निदर्शनास आले

महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी तीन ठिकाणी फुटल्याचे निदर्शनास आले. हे सांडपाणी कोप्रान कंपनीतून बाहेर पडत असल्याचा संशय परिसरातील ग्रामस्थांना आल्याने संतप्त ग्रामस्थांच्या जमावाने या कारखान्याच्या एका अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला.गेल्या तीन चार दिवसांपासून कोप्रान कंपनीच्या बाहेर सांडपाणी बाहेर येत असल्याचे निदर्शनास येत होते. शनिवारी देखील या प्रकरणी संतप्त ग्रमस्थांनी या कारखान्याबाहेर जमून नाराजी व्यक्त केली होती. बुधवारी या प्रकारात वाढ झाल्यानंतर मात्र ग्रामस्थांचा संयम सुटला आणि त्यांनी पुन्हा या कारखान्याकडे धाव घेतली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स.पो.निरिक्षक आबासाहेब पाटील यांनी देखील या कारखान्याकडे धाव घेवून जमावाची समजूत काढून त्यांना पांगविले. मात्र तत्पूर्वीच या जमावाच्या रागाचा फटका या कारखान्याच्या एका अधिकाºयाला बसला.स.पो.निरिक्षक पाटील यांनी कोप्रानच्या व्यवस्थापनाला हे बाहेर आलेले सांडपाणी उपसून टाकण्याची सूचना केली. हे काम करत असतानाच औद्योगिक विकास महामंडळाची सांडपाणी वाहून नेणारी मुख्य वाहिनी तीन ठिकाणी फुटल्याचे आणि त्यातूनच ही गळती होत असल्याचे निदर्शनास आले. हा सर्व प्रकार घडत असताना एमआयडीसीचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी फिरकला नव्हता. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी माने आणि क्षेत्र अधिकारी वसावा आणि ताटे यांनी घटनास्थळावरून सांडपाण्याचे नमुने घेतले आहेत.एमआयडीसीची सांडपाणी वाहिनी फुटली आहे, याबाबत पत्रव्यवहार आम्ही एमआयडीसीकडे केला होता मात्र त्याची दखल घेतली नाही असा दावा कोप्रानचे महाव्यवस्थापक सक्सेना यांनी पत्रकारांशी बोलताना केला.