शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस-वेलगत ३७ गावे होणार हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:57 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस- वेसह जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्राधिकरणाकडून रायगड जिल्ह्याच्या खालापूर, पनवेल या तालुक्यातील गावांचा विकास करण्यात येणार आहे.

अमोल पाटीलखालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस- वेसह जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्राधिकरणाकडून रायगड जिल्ह्याच्या खालापूर, पनवेल या तालुक्यातील गावांचा विकास करण्यात येणार आहे.एक्स्प्रेस-वेलगतच्या गावांमध्ये एमएसआरडीसी विकास करणार असल्याने त्याची माहिती देण्यासाठी नुकतीच खालापूर पंचायत समिती शिव छत्रपती सभागृहात एमएसआरडीसीच्या पुढाकारातून शेतकरी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच यांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला एमएसआरडीसी सहयोगिका सारिका बोधनकर यांच्यासह इतर अधिकारी तर जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, श्रध्दा साखरे, मोतीराम ठोंबरे, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.सुरुवातीलाच सारिका बोधनकर यांनी, एमएसआरडीसीच्या माध्यमातून एक्स्प्रेस-वेलगत असणाऱ्या खालापूर तालुक्यातील एकूण ३७ गावांमध्ये आगामी काळात एमएसआरडीसी नव्याने स्मार्ट सिटीसारखा विकास करणार असल्याची संकल्पना विषद करून विकासाची नवी संकल्पना मांडली. या नव्या विकासाचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच आराखडा प्रसिद्ध करून त्यावर सूचना हरकती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकºयांच्या जमीन भूसंपादनापासून जमिनीवर येणारी विविध आरक्षणे, जमीन मोबदला याबाबतही माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी अनेक हरकती, सूचना, मागण्यांबाबत विचारणा केली.एमएसआरडीसीच्या माध्यमातून विकास करण्यात येणार आहे.याठिकाणी रोजगार, शिक्षण, व्यापार असे विविध हब प्रस्तावित आहेत. शेतकरी, ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच हा विकास करण्याचा मानस शासनाचा आहे. या प्रकल्पाबाबतचे समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न म्हणून ही बैठक घेण्यात आली आहे.- सारिका बोधनकर, एमएसआरडीसी, सहयोगी सदस्यविकासासाठी आमचा विरोध नाही, पण विकास शाश्वत हवा. शेतकरी, ग्रामपंचायती यांचे हक्क अबाधित राहावे. भूसंपादन हे जास्तीत जास्त बाहेरील मोठे जमीन मालक आहेत त्यांच्या जमिनीवर करून स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ यांच्यावर अन्याय होणार नाही, असाच विकास आराखडा तयार करण्यात यावा.- नरेश पाटील, सभापती, जिल्हा परिषद रायगड