शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण का केली? आमदार संजय गायकवाड म्हणाले, 'वरण खराब निघाल्याने..."
3
"लोक म्हणाले, न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा"; प्रिया फुके मुलासह 'शिवतीर्थ'वर पोहचल्या
4
मुंबई: आईला म्हणाला, 'लवकरच जेवायला घरी येतो' अन् ओंकारने अटल सेतूवरून मारली उडी; ३६ तासानंतरही शोध सुरूच
5
Video: स्टंपचे दोन तुकडे... Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने केला भन्नाट कारनामा
6
जमीन खणताच नशीब फळफळलं, मजुराच्या हाती लागली मौल्यवान वस्तू, काही तासांतच झाला लखपती    
7
Ahmedabad Plane Crash : विमान अपघातातील 'त्या' १९ लोकांवर गुजरात सरकारने केले अंत्यसंस्कार; पण कारण काय?
8
तुमचं जनधन खातं बंद होणार? खातेधारकांमध्ये गोंधळ, सरकारनं दिलं स्पष्टीकरण
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
10
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
11
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
12
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
13
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
14
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
15
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
16
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
17
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
18
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
19
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
20
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही

जिवंत देखावे ठरताहेत विशेष आकर्षण

By admin | Updated: January 23, 2016 03:13 IST

किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या रायगड महोत्सवाला शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

महाड : किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या रायगड महोत्सवाला शुक्रवारी दुसऱ्या दिवशी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाचाड येथे उभारलेले वाहनतळे, पूर्ण पॅक झाले असून, वाहनपार्र्किंगसाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी पोलीस यंत्रणेची धावपळ सुरू आहे. शनिवारी आणि रविवार सुटीचे दिवस असल्याने या दोन दिवसांत पर्यटकांची मोठ्या प्रमाणवर गर्दी उसळणार असल्याचे संकेत मिळत आहे. गडावर जाण्यासाठी रोप वेला चार तास पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाइलाजास्तव या पर्यटकांना चित्रदरवाजामार्गे पायी पायऱ्याच्या मार्गाने जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.२१ ते २४ जानेवारीदरम्यान राज्य शासनाच्या सांस्कृतिक खात्यातर्फे या रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे गुरु वारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित उद्घाटन झाले. त्यानंतर सायंकाळपासून रायगड महोत्सव पाहण्यासाठी पर्यटकाची गर्दी होत आहे. रायगड आणि गडाच्या पायथ्याशी असलेले पाचाड हे गाव शिवमय झाले आहे. कलादिग्दर्शिक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून पाचाड परिसरात जिजामाता वाड्याजवळ भव्य शिवसृष्टी उभारण्यात आली असून, या शिवसृष्टीद्वारे शिवकालीन जीवनशैली अनुभवण्याचा योग पर्यटकांना लाभत आहे. या परिसरात उभारलेल्या स्टॉलमध्ये खवय्याची चांगली सोय झाली आहे. गुरु वारी पहिल्या दिवशी रात्री डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले शिवचरित्रावरील भगवा ही नाट्यकृती सादर झाली. या महोत्सवात दांडपट्टा, लाठीकाठी या मर्दानी खेळांसह आदिवासी नृत्य व पारंपरिक लोककलांचे दर्शनही स्थानिक कलाकारांकडून होत आहे.रायगडावरील राज्याभिषेकाचा जिवंत देखावा हे या महोत्सवाचे खास आकर्षक ठरत आहे. राप वेने चढून वर गेले की वासुदेव, शाहीर, पोतराज यांचे दर्शन होत आहे. राण्यांच्या महालात बसलेल्या जिजाऊ, त्यांच्याशी चर्चा करणारे मोरोपंत, राण्यांचा थाट, अष्टप्रधान महालात चाललेला त्यावेळचा कारभार पाहत समोर आले की जिजाऊंची कला लक्ष वेधून घेते. पालखी दरवाजातून खाली उतरले की, गंगासागर तलावाजवळ सप्त मनोऱ्यालगत आदिवासींचे मनोरे नृत्यू सुरू असते. त्यापुढे सांगली येथील धनगराचे गोफनृत्य सुुरू आहे. होळीच्या माळावर ढोलपथकाच्या दणाणणाऱ्या आवाजाने स्वागत होते.बिरवाडी : किल्ले रायगडावर तसेच पाचाड येथे सुरू असलेल्या रायगड महोत्सवाकरिता महाड आगारातून जादा बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत. रायगड महोत्सवासाठी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांची त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्याकरिता चांगली सोय व्हावी, म्हणून महाड आगाराकडून जादा बससेवा सुरू करण्यात आली आहे. २१ ते २४ जानेवारीपर्यंत जादा बससेवा किल्ले रायगड महोत्सवासाठी महाड ते पाचाड व नातेखिंड ते पाचाड अशा सोडण्यात येणार आहेत. महाड ते पाचाड तिकीट दर २५ रुपये, नातेखिंड ते पाचाड तिकीट दर २२ रुपये असेल. विशेष म्हणजे कोकण रेल्वेच्या वीर रेल्वे स्थानक ते पाचाड अशी थेट बससेवाही सुरू करण्यात आली आहे. वीर रेल्वे स्टेशन ते पाचाड तिकीट दर ४४ रुपये आहे.