शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क विभागाने पुन्हा कारवाईत जप्त केला लाखाचा गांजा; दोन आरोपींना घेतले ताब्यात

By राजेश भोस्तेकर | Updated: June 15, 2024 21:59 IST

उत्पादन शुल्क विभागाने १२ जून रोजी केलेल्या कारवाईत अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता १९ जून पर्यंत उत्पादन विभागाची कस्टडी दिली. 

अलिबाग : राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळोजा येथे १२ जून रोजी १ कोटी रूपये किमंतीचा गांजा हा  अंमली पदार्थ जप्त करून दोन आरोपींना अटक केली होती. तपासिक अधिकारी रायगडचे उत्पादन शुल्क अधिकारी रविकिरण कोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असताना पुन्हा तपासात दोन आरोपींना अटक करून वाहनासह ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

उत्पादन शुल्क विभागाने १२ जून रोजी केलेल्या कारवाईत अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता १९ जून पर्यंत उत्पादन विभागाची कस्टडी दिली.  आरोपींना कार्यालयात चौकशीकामी आणले असता आरोपी परवेझ शेख याचे मोबाईलवर एका अनोळखी इसमाचा कॉल आला त्याने अंकल मी पनवेल येथे माल घेऊन आज सायंकाळी ५ ते ६ वाजे दरम्यान ईनोव्हा गाडीने येत आहे असे बोलला सदर इसमाशी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी सुध्दा ते अंकलच आहेत असे बोलून त्याला तु सदर माल घेऊन तक्का पनवेल येथे जुना मुंबई-पुणे रोडवर पंचमुखी मारूती मंदिर समोर ये असे सांगितले.

उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला. माल घेऊन आलेले हनोझ होशी इंगीनीर (इंजिनियर) रा. लोणावळा, व दिवा उंबरे या आरोपींना ईनोव्हा कार सह १३५ किलो गांजासह ४५ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे गांजा सारख्या अंमली पदार्थाचे रॅकेट हे मोठ्या प्रमाणात असल्याचे या कारवाईने समोर आले आहे. 

 डॉ. विजय सुर्यवंशी (भा. प्र. से.) आयुक्त सो., राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे, आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक,  उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, दुय्यम निरीक्षक कृष्णा देवरे, दुय्यम निरीक्षक अजित बडदे, दुय्यम निरीक्षक,  गणेश कुदळे तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे सखाराम पवार हे सहभागी होते.

सदरील गुन्हयाचा पुढील तपास आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करत आहेत.