शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जादा बसेसची मागणी

By admin | Updated: September 30, 2015 00:10 IST

नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेसमध्ये वाशी बस स्थानकात सायंकाळी सहा ते आठ दरम्यान अपुऱ्या बसेसमुळे नागरिकांची होणारी गर्दी आणि याच गर्दीचा फायदा

उरण : नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेसमध्ये वाशी बस स्थानकात सायंकाळी सहा ते आठ दरम्यान अपुऱ्या बसेसमुळे नागरिकांची होणारी गर्दी आणि याच गर्दीचा फायदा उठवित बसमध्येच होत असलेल्या पाकीटमारीच्या वाढत्या घटनांमुळे उरण - वाशी मार्गावरील प्रवासी त्रस्त आहेत. विशेषत: विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्यासाठी सायंकाळी सहा ते आठ दरम्यान उरण - वाशी मार्गावर जादा बसेस सुरू करण्याची मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी परिवहन सभापतींकडे केली आहे.नवी मुंबई परिवहन सेवा उरणकरांसाठी उपयुक्त ठरु लागली आहे. या सेवेचा लाभ बहुतांश उरणकर घेत आहेत. उरणमध्ये उच्च आणि तांत्रिक शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे शिक्षणासाठी आणि रोजगाराच्या निमित्ताने दररोज हजारो विद्यार्थिनी, महिला उरण - वाशी या मार्गावर प्रवास करीत आहेत. यामध्ये विविध कामानिमित्ताने ये-जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. उरण - वाशी - कोपरखैरणे दरम्यान नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेस प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. वाशी बस स्थानकात कोपरखैरणे येथून येणाऱ्या बसेस याआधीच हाऊसफूल्ल असतात. त्यामुळे वाशी बस स्थानकात सायंकाळी सहा ते आठ दरम्यान अपुऱ्या बसेसमुळे विद्यार्थिनी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना वाशी स्थानकापासून उरणपर्यंत उभ्याने प्रवास करण्याची पाळी येते. बसमध्ये चढ - उतार आणि प्रवासादरम्यान मुली, महिला, विद्यार्थिनींना धक्काबुक्कींचाही त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गर्दीचा गैरफायदा घेत महिलांना धक्काबुक्की होत आहे. बसमध्ये होत असलेल्या पाकीटमारीच्या घटनांचाही कटू अनुभव घेण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यामुळे नागरिकांची या त्रासापासून सुटका करण्यासाठी उरण - वाशी मार्गावर जादा बसेस सोडण्याची मागणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी परिवहन सभापतींकडे केली आहे.