शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, हरवलेल्या मुलाला शोधून काढण्यात मिळाले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:45 IST

न सांगताच घरातून गायब होण्याचे प्रमाण सध्या वाढले असून, हरवलेल्या लोकांना शोधून काढण्याची आता पोलिसांवर जबाबदारी येऊन पडली आहे.

मुरुड जंजिरा : न सांगताच घरातून गायब होण्याचे प्रमाण सध्या वाढले असून, हरवलेल्या लोकांना शोधून काढण्याची आता पोलिसांवर जबाबदारी येऊन पडली आहे.मुरुड शहरालगत विहूर ग्रामपंचायतीमध्ये राहणारे महेश सुदाम कदम यांचा १५ वर्षांचा मुलगा इयत्ता दहावीमध्ये शिकत असून, अभ्यास वेळच्या वेळी करत नसल्याने पालक ओरडल्यामुळे याचा मनात राग ठेवून एक दिवस तो त्याच्या राहत्या घरातून कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडला. सायंकाळ झाली तरी मुलगा घरात न आल्याने या मुलाचे पालक चिंताग्रस्त होऊन त्यांनी मुरु ड पोलीस ठाणे गाठले व घडलेली सर्व हकिकत सांगून आमच्या मुलाचा शोध घेण्याची विनंती केली. वेळ न घालवता मुरु ड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे व पोलीस उपनिरीक्षक विजय गोडसे यांनी पोलिसांचे एक पथक तयार करून मुरु ड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारे बस थांबे, शाळा, विक्र म रिक्षा स्थानक आदी भागात कसून चौकशी करण्यास सुरुवात केली.चौकशी करता करता बसस्थानकातील मुरु ड भालगाव मार्गे रोहा या गाडीत हा मुलगा बसलेला त्यांना दिसून आला. तातडीने या मुलास मुरु ड पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणून त्याची चांगल्या पद्धतीने समजूत घालूनसदरचा मुलगा वडिलांकडे देण्यात आला आहे. अवघ्या काही तासांच्या अंतरावर मुरु ड पोलिसांनी सजगता दाखवत मुलगा शोधूनकाढल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक विजय गोडसे म्हणाले की, सदरचा मुलगा अभ्यासाला कंटाळून घरातून न सांगताच निघून गेला होता. आम्ही त्याचे चांगले प्रबोधन केले असूनआई-वडील हे तुझ्या भल्यासाठीच ओरडत आहेत. अभ्यासावरलक्ष केंद्रित कर असा सल्लाही या वेळी दिल्याचे त्यांनी सांगितले. मुलगा त्वरित सापडल्याने मुलाच्या आई-वडिलांनी मुरुड पोलिसांचे आभार मानले आहे.

टॅग्स :Raigadरायगडpanvelपनवेल